नाशिक

दर्जेदार रस्ते, नागरी सुविधांना प्राधान्य

आमदार माणिकराव कोकाटे; जुना गुळवंच रोडच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते, सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शहराच्या सर्व भागांत मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, जुना गुळवंच रोडच्या काँक्रिटीकरणामुळे प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
जुना गुळवंच रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 25 सप्टेंबर) सायंकाळी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजाभाऊ वाजे होते. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक निधीतून या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रभाग 2 व 3 मधील नागरिकांची ये-जा अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. जुना गुळवंच रोड हा सिन्नर शहराच्या पूर्व भागातील महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. या रस्त्यावरून परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र, रस्त्याच्या स्थितीमुळे नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. काँक्रिटीकरणामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी सिन्नर नगर परिषदेमार्फत शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. शहरातील प्रलंबित कामे वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या इंजि. सिमंतीनीताई कोकाटे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती राजाभाऊ चव्हाणके, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सागर भाटजिरे, शिवसेना पक्षाचे गटनेते मनोज देशमुख, शिक्षण व क्रीडा सभापती कांताबाई जाधव, आरोग्य सभापती ललिता हांडे, बांधकाम सभापती उदय गोळेसर, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक अ‍ॅड. पंकज जाधव, शेखर गोळेसर, सुदर्शन नाईक, बाळासाहेब उगले, विलास जाधव, सागर कोथमिरे, शुभम वारुंगसे, अमोल झगडे, विजय वरंदळ, सुनील गवळी, अशोक जाधव, नगरसेविका सविता कानडी, गीता वरंदळ, सुवर्णा उबाळे, मनीषा गवळी, ज्योती मोरे, सविता खोळंबे, संध्या कासार, अंबिका धनगर, कमळाबाई पगार, निशा बोडके आणि शोभा जाधव यांची उपस्थिती होती. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम, नगर परिषद कर्मचारी तसेच प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार

जुना गुळवंच रोडच्या काँक्रिटीकरणामुळे प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबरच नागरिकांची दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

लोकप्रतिनिधी-प्रशासनाच्या समन्वयातून विकास : वाजे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार राजाभाऊ यांनी शहराच्या शाश्वत विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. नागरिकांच्या स्थानिक समस्या प्राधान्याने सोडवून आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Priority for quality roads and civic amenities.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago