नाशिक

कारागृह मद्यधुंद व्हिडिओमुळे यंत्रणा खडबडून जागी

तीन अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची जबाबदारी असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकार्‍यांचा एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. कारागृहातून नुकत्याच बाहेर पडलेल्या एका संशयित आरोपीसोबत चक्क कारागृह अधिकार्‍यांनीच ‘दारू पार्टी’ केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे कारागृह वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. या पार्टीत सहभागी असलेल्या तीन तुरुंग अधिकार्‍यांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका फसवणुकीच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला संशयित आरोपी गौरव मिश्रा हा नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. तो तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कारागृहाच्याच अधिकारी निवासस्थानाबाहेर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कथित दारू पार्टीत कारागृहाचे अधिकारी संशयित आरोपी मिश्रासोबत टेबलभोवती बसून मद्यधुंद अवस्थेत एन्जॉय करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिरालाल भामरे, जगदीश ढुमने आणि अशोक मलवाड हे तीन तुरुंग अधिकारी स्पष्टपणे दिसत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीसोबत शासकीय निवासस्थानाच्या आवारात अशा प्रकारे पार्टी करणे या अधिकार्‍यांच्या अंगाशी आले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिक कारागृह प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि शिस्तीचा भंग केल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. आरोपी आणि जेल अधिकार्‍यांमधील हे ’मधुर’ संबंध समोर आल्याने नाशिकरोड कारागृहाच्या सुरक्षेवर आणि अंतर्गत कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या तिन्ही अधिकार्‍यांना सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यावर पुढील कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करतील.
– अरुण मुगुटराव, मुख्य अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अरुणा मुगुटराव

Prison drunk video shakes up system

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

8 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

8 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

8 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

8 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

9 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

9 hours ago