ओझे परिसरात मादी, बछड्यांमुळे दहशत मात्र कायम
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील ओझे येथे मागील आठवड्यात उसाच्या शेतात एका शेतमजुरावर सलग तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा नर बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजर्यात जेरबंद झाला. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून या बिबट्याचा वावर होता. अखेर तो जेरबंद झाल्याने शेतकर्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र, परिसरात अजूनही मादी बिबट्या व तिचे बछडे असण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.
ओझे परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने शेतमजुरावर हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली होती. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ज्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला होता, त्या बाळू धुळे यांना प्रत्यक्ष बोलावून खात्री केली असता, त्यांनी याच बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले.
दरम्यान, याच परिसरातील दुसर्या एका भागात मेंढपाळावर हल्ला झाला होता तिथेही वन विभागाने पिंजरा लावला आहे. मात्र, या पिंजर्यात वन विभागाने अद्याप भक्ष्य ठेवले नसल्याची माहिती समोर येत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित भक्ष्य ठेवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. ओझे परिसरात बिबट्यांचा उपद्रव वाढल्याने वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माझ्या शेतात काम करणार्या बाळू धुळे या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला होता. काठीमुळे त्याचे प्राण वाचले. आज एक बिबट्या जेरबंद झाला असला, तरी उसाच्या शेतात असणारी मादी आणि तिच्या बछड्यांचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे वन विभागाने या परिसरात पुन्हा पिंजरा लावावा.
– प्रवीण शिंदे, शेतकरी, ओझे
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…