नाशिक

खासगी व्यापार्‍यांचे दर ’नाफेड’ पेक्षा जास्त

वरिष्ठ अधिकार्‍यांचा निफाड बाजार समितीतून काढता पाय

निफाड : तालुका प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीतील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. शासनाने जाहीर केलेला 1580 रुपये प्रतिक्विंटल हा दर अत्यंत कमी असल्याने, शेतकर्‍यांनी सरकारी केंद्रांकडे पाठ फिरवून स्थानिक व्यापार्‍यांना कांदा विकण्यास प्राधान्य दिले आहे. या वास्तवाचा थेट प्रत्यय मंगळवारी (दि. 9) निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहणीसाठी आलेल्या
नाफेडच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आला.
बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरू असताना व्यापारी
नाफेडच्या दरापेक्षा कितीतरी अधिक दराने कांदा खरेदी करत असल्याचे अधिकार्‍यांनी स्वतः पाहिले. याच वेळी उपस्थित शेतकरी आणि माध्यम प्रतिनिधींनी अधिकार्‍यांना थेट कोंडीत पकडले. ‘जेव्हा व्यापारी अधिक दर आणि रोख पैसे देत आहेत, तर शेतकरी नाफेडला कांदा का विकेल?’असा थेट सवाल विचारताच अधिकार्‍यांची बोलती बंद झाली. उत्तर देणे टाळत या अधिकार्‍यांनी तेथून काढता पाय घेतला, ज्याची जोरदार चर्चा बाजार आवारात रंगली होती.

थोडक्यात काय तर…
शासनाने केवळ खरेदी केंद्रे सुरू केल्याचा देखावा न करता, शेतकर्‍यांच्या वास्तव समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रशासनाने आता तरी हा विषय गंभीरपणे घ्यावा, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.नाफेडचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे खरेदीदार हे मंगळवारी दुपारच्या कांदा लिलाववेळी म्हणजे साडेचारच्या दरम्यान आले होते. मात्र याची बाजार समिती प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. अगदी शेवटच्या लाइनला नाफेडचे दोन अधिकारी आले होते. मात्र कुठलीही कांदा खरेदी न करता ते निघून गेले.
-पप्पू खालकर, लिपिक, निफाड उपबाजार आवार

Private traders’ rates are higher than NAFED’s.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

20 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

20 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

20 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

21 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

21 hours ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

21 hours ago