नाशिक

मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात राडा

शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून डॉक्टर, कर्मचार्‍यांना बेदम मारहाण

मनमाड : प्रतिनिधी
शहरात झालेल्या पहिल्याच पावसात भिंत कोसळून जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले नाहीत, असा आरोप करत सत्ताधारी शिंदे गटाचे नगरसेवक विशाल आहिरे आणि त्यांच्या साथीदारांनी उपजिल्हा रुग्णालयात धुडगूस घातला. संतप्त नगरसेवकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. हा संपूर्ण थरार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी डॉ. योगीराज शिंदे यांच्या तक्रारीवरून नगरसेवकासह इतरांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, मनमाड शहरात मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मातोश्री रमाबाईनगर येथील रहिवासी संजय संसारे यांच्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत संजय संसारे आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान संजय संसारे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्यामुळेच संजय संसारे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईक आणि समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली. यावेळी मनमाड शहरातील सत्ताधारी गटाचे (शिंदेसेना) नगरसेवक विशाल आहिरे हे त्यांच्या काही साथीदारांसह रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांशी वाद घालत असताना अचानक या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नगरसेवक विशाल आहिरे आणि त्यांच्या समर्थकांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आल्याचे समजते. रुग्णालयात झालेल्या या बेदम मारहाणीचा आणि गोंधळाचा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे मनमाडमधील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला
जात आहे.

नगरसेवकासह साथीदारांवर गुन्हे दाखल

या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीराज शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक विशाल आहिरे आणि प्रमोद आहिरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे मनमाड शहरात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत असून, आरोपींचा शोध घेत आहेत.

Protest at the sub-district hospital in Manmad

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago