नाशिक: प्रतिनिधी
वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त व लेखा विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले.
कनिष्ठ लेखाधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद कार्यालय नाशिक.किरण रंगनाथ दराडे वय-40 व. कनिष्ठ सहाय्यक (लेखा )वित्त विभा सचिन प्रभाकर पाटील वय 40 अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार हे शिक्षक असून त्यांचे व इतर 17 शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांच्या सेवा पुस्तकासह एकूण 18 सेवा पुस्तके लोकसेवक क्रमांक एक यांच्याकडे जमा केली होते सदर 18 शिक्षकांची वेतन पडताळणी करून सेवा पुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्या समक्ष सुरुवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे 700/-रुपये याप्रमाणे 18 सेवा पुस्तकांचे 12600/- रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती 11000/- रुपयांची मागणी करून सदर लाचेची रक्कम लोकसेवक क्रमांक एक यांच्या सांगण्यावरून लोकसेवक क्रमांक दोन यांनी सदरची रक्कम लाचेची आहे हे माहीत असताना देखील स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक,श्रीमती मीरा वसंतराव आदमाने पो. हवा.पंकज पळशीकरपो.हवा.प्रमोद चव्हाणके पो.हवा. संदिप वणवे यांच्या पथकान पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अपर पोलिस अधिक्षक,माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…