नाशिक

पाथर्डी-वडनेर रोडवर जुगारअड्ड्यावर छापा

भूमिअभिलेख अधिकार्‍यासह सात जणांवर गुन्हा

सिडको : प्रतिनिधी
पाथर्डी-वडनेर रोडवरील मँगो फार्म हॉटेल परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर इंदिरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली पोलिसांची कारवाई पहाटे एक वाजेपर्यंत
सुरू होती.
या कारवाईत 37 हजार 620 रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेश गांगुर्डे, संकेत जाधव, रामकृष्ण बोडके, विशाल कोरडे, दीपक भोगे, श्याम इंदोरा आणि भूषण जोरावर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची
नावे आहेत.
पाथर्डी-वडनेर रोड परिसरात अनेक फार्म, हॉटेल आणि ढाबे असून, या ठिकाणी विविध प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. याच पार्श्वभूमीवर एका हॉटेलच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीची खातरजमा केल्यानंतर पथक तयार करून शुक्रवारी रात्री संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच जुगार खेळणार्‍यांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत कारवाई केली. घटनास्थळावरून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, संबंधित सात जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पाथर्डी-वडनेर रोड परिसरातील हॉटेल आणि फार्मच्या आडून सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशा ठिकाणी जुगारासह अन्य अवैध प्रकार सुरू असतील तर त्यांची सखोल तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, केवळ एका ठिकाणी कारवाई न करता परिसरातील संशयास्पद हॉटेल, फार्म आणि ढाब्यांची तपासणी करून अवैध धंद्यांना आळा घालण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलिस करीत आहेत.

Raid on a gambling den on the Pathardi-Vadner Road.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago