नाशिक

पैशांचा पाऊस पाडणारा भोंदू ‘बर्डेबाबा’ कोठडीत!

आणखी सहा लाखांची फसवणूक उघडकीस आल्याने खळबळ

अभोणा : प्रतिनिधी
अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळे खुर्द येथील हिराचंद बर्डे या भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुंबईसह परिसरातील नागरिकांना मंत्र-तंत्र व पूजाविधीच्या बहाण्याने लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पीडितांनी 10 सप्टेंबरला अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेतील भोंदूसह तिघांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आणखी दोन व्यक्तींनी सहा लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भोंदूबाबा हिराचंद बर्डे मंत्र-तंत्र आणि पूजाविधीने नोटांचा पाऊस पाडतो, या अंधश्रद्धेतून एका फिर्यादी व त्याच्या मित्रांनी सुरुवातीला प्रत्येकी एक हजार रुपये दिले.
भोंदूने हातचलाखीने दोन लाख रुपये करून दाखवल्याचे भासवले आणि हजाराचे दीड हजार रुपये प्रसाद म्हणून देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, “तुम्ही पाच जणांनी 11 लाख रुपये दिले तर 15 कोटींचा पाऊस पाडून देईल,” असे लोभाचे जाळे
त्याने टाकले.
लोभापोटी पीडितांनी वेळोवेळी रोख व ऑनलाइन माध्यमातून तब्बल 10 लाख 95 हजार रुपये भोंदूला दिले. त्यानंतर एका पूजाविधीदरम्यान 3 कोटींचा पाऊस पाडल्याचे भासवून त्याने गोणीभर नोटांचे बंडल दिले आणि “ही गोणी घरी नेऊन सात दिवस पूजा करा, त्याआधी गोणी उघडली तर अंगावर कोप होईल,” अशी भीती घातली. मात्र, काही दिवसांनी गोणी उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. बंडलमध्ये वर फक्त पाचशेची एक नोट खरी होती, तर बाकी सर्व लहान मुलांच्या खेळण्यातील खोट्या नोटा निघाल्या.
या प्रकारानंतर पीडितांनी जाब विचारला असता, “तुम्हाला कपडे काढून अमावास्येच्या रात्री स्मशानात पूजा करावी लागेल,” अशी भयंकर अट त्याने ठेवली. पीडितांनी नकार देत पैसे परत मागितल्यास त्यांना गायब करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, ज्यामुळे सर्वजण दहशतीखाली होते.

आवाहनाला प्रतिसाद; आणखी दोघे पुढे

भोंदूकडून फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी अभोणा पोलीस किंवा अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, अभोणा पोलीस ठाण्यात आणखी सुमारे सहा लाखांच्या फसवणुकीच्या दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुलाब साहेबराव पवार (रा. खालप, ता. देवळा), किरण रामदास धुमाळ (रा. विंचूर, ता. निफाड) यांना प्रत्येकी तीन लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील इतर मोकाट भोंदूंच्याही लवकरात लवकर मुसक्या आवळाव्यात, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून होत आहे.

‘Bardebaba’, the fraudster who claimed to make it rain money, is in custody!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago