नाशिक

सातपूरमध्ये जुगारअड्ड्यावर छापा

47 जण ताब्यात, 86 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त

सिडको : प्रतिनिधी
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंगनगर परिसरातील अण्णाचा मळा येथील बंद हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारअड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 च्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत जुगारअड्डा चालविणार्‍या दोघांसह जुगार खेळणार्‍या 47 जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाइल, दुचाकी, तसेच चारचाकी वाहने, असा एकूण 86 लाख 78 हजार 345 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत सचिन अण्णासाहेब गांगुर्डे (वय 39, रा. सातपूर कॉलनी, शिवनेरी गार्डनसमोर, सातपूर, नाशिक) आणि अनिल दत्ता शेजवळ (वय 42, रा. सातपूर गाव, नाशिक) यांना जुगारअड्डा चालविल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
जुगार खेळताना सुधाकर लक्ष्मण केदारे, दीपक बाळकृष्ण वाघ, सागर मनोहर तोरणे, विजय नामदेव वरकडे, योगेश चुडामण पाटील, हरिशंकर जगदीश पाल, अजय राजू पडघान, शेख हाकीम यासीन, मनोज कैलास अहिरे, मनोज गारुती गुंजाळ, लक्ष्मण नंदुमल कुमार, मगन रामा मांगची, संदीप अंंबादास गिरासे, जगन दत्तू लभडे, सोपान बाबूराव नेरे, वामन पांडुरंग चुंभळे, नवनाथ तुकाराम वरंदळ, उत्तम काशीनाथ मंडलिक, शैलेश अनिरुद्ध शर्मा, निवृत्ती गणपत पिंगळे, मनोज मोरचंद विग, रमेश नारायण येवले, जाहिद अब्दुल गनी पठाण, प्रसाद प्रभाकर आवेकर, विक्रम गंगाधर राऊत, संजय गोपाळ वराडे, भावेश विठ्ठल शेळके, शिवाजी नारायण कदम, गोविंद दिलीप मवाळ, विजेंद्र सुकलाल परदेशी, अनिल आनंदा पाटील, नेताजी वसंत आहिरे, स्वप्नील जोगेंद्रसिंग वव्हाण, पांडुरंग पुंडलिक पवार, देवेंद्र रघुवीर पारोळेकर, सुनील रामहरी सावळकर, विलास दिगंबर पाटील, विजय पांडुरंग पाटील, वैभव सुभाष सावंत, विलास नारायण जाधव, बिपिन धर्मेंद्र सिन्हा, प्रमोद अशोक अहिरे, नितीन रामलाल पवार, ऋतिक दीपक चव्हाण, दिगंबर कापसा पगारे, शरद बबन नागरे आणि भानुदास पंढरी बिन्नर यांचा समावेश आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री सुमारे 8.15 वाजता अण्णाचा मळा येथील बंद हॉटेलच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. या ठिकाणी पैशांच्या मोबदल्यात तीन पत्ती जुगार खेळविण्यासाठी टेबल-खुर्च्या, पत्ते, एअर कूलर आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाइल फोन आणि चारचाकी वाहनांसह एकूण 86 लाख 78 हजार 345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार नांदुर्डीकर यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली होती, तरीदेखील छापा टाकल्याची माहिती शहरभर वार्‍यासारखी परसली. यावेळी नाशिक महानगरपालिका हद्दीतील काही आजी-माजी नगरसेवकांसह प्रतिष्ठित राजकीय पदाधिकारी, डॉक्टर यांसह सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकदेखील याठिकाणी जुगार खेळत असल्याचे समजते. जर शहरातील नामांकित, प्रतिष्ठित जुगार खेळत असतील तर मग हे जुगारी या कारवाईतून गायब झाले की गायब केले गेले? या कारवाईतून त्यांना जाणूनबुजून वगळण्यात आले. याबाबत सातपूर परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.

Raid on gambling den in Satpur

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago