नाशिक

सिडकोत पावसामुळे नागरिकांचे हाल, वाहनांचे नुकसान

सिडको : प्रतिनिधी
मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नवीन नाशिक परिसराला उष्णतेपासून काहीसा दिलासा दिला असला, तरी नागरिकांची मोठी गैरसोय झाली. विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्तेकामांमुळे पावसाचे पाणी आणि चिखल यांचा सामना नागरिकांना करावा लागला. अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली, तर पादचार्‍यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी वार्‍यामुळे काठे गल्ली परिसरात एक गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. हे झाड रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले. तसेच सिडकोतील माउली लॉन्स परिसरातही एक झाड रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागासह उद्यान विभागाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटविण्याचे काम केले. त्यामुळे काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दुपारी चारच्या सुमारास त्रिमूर्ती चौक, पवननगर आणि उत्तमनगर परिसरात हलक्या पावसाने सुरुवात झाली. त्यावेळी अंबड आणि परिसरात केवळ ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास संपूर्ण नवीन नाशिक परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागली. पावसाच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्याने काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. रस्ते खोदकाम सुरू असलेल्या भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, पहिल्याच पावसादरम्यान सिडकोसह इंदिरानगर, वडाळागाव, पाथर्डी, कामटवाडे आदींसह अनेक भागांतील बत्ती गुल झाली होती तर काही भागात विजेचा लपंडाव सुरू होता. वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मुसळधार पाऊस, वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या होत्या. वीजपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे नवीन नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत विविध भागात टप्प्याटप्प्याने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Rain in CIDCO causes hardship to citizens, damages to vehicles

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago