नाशिक : प्रतिनिधी
जुन्या नाशिकमधील बुधवार पेठ येथील पाटील गल्ली परिसरात मंगळवारी (2 जून) दुपारी 2 वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला असून, 24 तासांहून अधिक कालावधी उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कर्मचार्यांशी व अधिकार्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समस्येच्या निराकरणाबाबत कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दीर्घकाळ वीजपुरवठा बंद असल्याने घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
याचदरम्यान, पाटील गल्लीतील रस्त्यावर विद्युत वाहिनी तुटून पडलेली असून, ती वाहतुकीच्या मार्गात असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनधारकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असून, संबंधित विभागाकडून तातडीने दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात सलग 24 तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिक शहरात अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत न केल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन महावितरणच्या भद्रकाली कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमशक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी दिला आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
♦ तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करावा.
♦ रस्त्यावर पडलेली विद्युत वाहिनी त्वरित हटवावी.
♦ परिसरातील वीज यंत्रणेची तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
♦ महावितरणने नागरिकांना समस्येबाबत स्पष्ट माहिती द्यावी.
Power supply disrupted in old Nashik; Citizens’ plight
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…