नाशिक : प्रतिनिधी
नाशकातील खड्ड्यांच्या गंभीर समस्येमुळे नागरिक त्रस्त असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रश्नात लक्ष घातले आहे. गुरुवार (दि. 6) व शुक्रवारी (दि. 7 ऑगस्ट) दोन दिवसीय नाशिक दौर्यावर येत असून, खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाबाबत ते काय भूमिका मांडतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. विविध राजकीय पक्षांनी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही नागरिकांचा अंत पाहू नका, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा, अशी प्रशासनाला सूचना केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या दौर्यामुळे या प्रश्नाला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
दौर्यादरम्यान राज ठाकरे मनसेच्या शहर व ग्रामीण संघटनांच्या पदाधिकार्यांच्या बैठका घेणार असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेणार आहेत. गुरुवारी सकाळी मुंबई नाका येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शाखाध्यक्ष, नाशिक ग्रामीणमधील 15 तालुक्यांची संयुक्त बैठक घेणार आहेत. शुक्रवारी सकाळी तरुणांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद
घेणार आहेत.
Raj Thackeray in Nashik today.
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…