format: 3; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 1; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (9, 2);aec_lux: 344.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथील तपोवन, केवडीवन परिसरातील स्वामीनारायण मंदिर केवडीवन येथे श्री रामनवमी तसेच श्री हरी जयंती भगवान स्वामिनारायण प्रागट्यदिन निमित्त भव्य धार्मिक उत्सवाचे आयोजन गुरुवारी दि. 26 रोजी करण्यात आले होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन
निघाला.
पवित्र गोदावरी नदीकाठी वसलेल्या या भव्य शिखरबद्ध मंदिरात भगवान श्रीराम आणि निळकंठ वर्णी भगवान स्वामिनारायण यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दुपारी 12 वाजता भगवान श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तर रात्री 10 वाजता भगवान स्वामिनारायण यांच्या प्रागट्यदिनाचा उत्सव उत्साहात पार पडला.
या निमित्ताने मंदिर परिसरात सायंकाळी 7.30 वाजता आकर्षक विद्युत रोषणाई व दीपोत्सव सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी प्रकाशयोजना आणि पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता.
दिवसभरात शेकडो भाविकांनी उपस्थित राहून भगवान श्रीरामांच्या दुपारच्या आरतीचा तसेच रात्री भगवान स्वामिनारायण आरतीचा लाभ घेतला. मंदिरातील शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
या उत्सवामुळे केवडीवन तपोवन परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
Ram Janmashtami celebrations at Swaminarayan Temple
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…