ना. नरहरी झिरवाळ, खरात विरोधात युवासेनेची शालिमारला निदर्शने
नाशिक : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असतानाच, त्याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थेचा कारभारही संशयास्पद आहे. गेल्या काही वर्षांत या संस्थानच्या आर्थिक उलाढालीत अचानक मोठी वाढ झाली. खरात प्रकरणाला अनेक कंगोरे असून, त्याने जमविलेली माया पंधराशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आता शिवनिका ट्रस्टचे खाते सील करण्यात आले आहे. अशोक खरातच्या शिवनिका संस्थानचे बँक अकाउंट सील करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवली असून, अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे. पुढील 2-3 दिवसांत तपासाला वेग येईल.
सर्व गुन्ह्यांचा एकत्रित तपास ‘एसआयटी’ करणार
भोंदू अशोक खरात प्रकरणी सर्व गुन्हे विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यापुढील तपास ‘एसआयटी’च्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान, अशोक खरातच्या मोबाइलमधील काही संभाषण तसेच व्हॉट्सअॅप डाटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे, तर वावी आणि शिर्डी पोलिसांकडील प्रत्येकी एक अशा 10 गुन्ह्यांचा एसआयटी तपास करणार आहे.
अशोक खरातवर नाशिक पोलिसांत 8 गुन्हे दाखल झाले आहेत, तर वावी पोलिसांत खरात याने दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. शिर्डी पोलिसांत अशोक खरातच्या ऑफिसबॉयविरोधात गुन्हा दाखल आहे.हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्याने सर्व गुन्ह्यांचा एकत्रित तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. एसआयटीच्या टीमने डीव्हीआर सीसीटीव्ही, लॅपटॉप, कागदपत्रे यांसह सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे.
बंदुकीचा परवाना रद्दची प्रक्रिया सुरू
नाशिक : प्रतिनिधी
भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्याकडे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला शस्त्र परवाना गुरुवारी (दि. 26) निलंबित करण्यात आला आहे. तसेच हा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित व्यक्ती सध्या कारागृहात असल्याने पुढील कार्यवाही कशी करायची याबाबत प्रशासन स्तरावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, खरात याच्याविरोधातील कारवाईनंतर त्याच्या विविध कृत्यांचा उलगडा होत असतानाच 2012 साली त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची बाब समोर आली. विशेष म्हणजे या परवान्याचे वेळोवेळी नूतनीकरणही करण्यात आले असून, जानेवारी 2024 मध्येही त्याचे नूतनीकरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तथापि, हा परवाना देताना ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अथवा संबंधित सिन्नर पोलीस ठाण्यात त्याची नोंद नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून परवाना देण्यात आला असताना पोलीस नोंदीत त्याचा अभाव कसा राहिला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा परवाना नियमांनुसार देण्यात आला की नियमबाह्य पद्धतीने, याची चौकशी जिल्हा प्रशासनाच्या गृह शाखेकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ हा शस्त्र परवाना निलंबित केला असून, कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या शस्त्र परवाना निलंबित करण्यात आला आहे. मात्र कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी संबंधित शस्त्रधारकाची बाजू ऐकणे आवश्यक आहे. त्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. संबंधित व्यक्ती कारागृहात असल्याने प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
– रोहितकुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी
Shivnika Sansthan’s bank account ‘sealed’
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…