पुरवठा सुरळीत : नागरिकांनी गर्दी करू नये
नाशिक : प्रतिनिधी
अमेरिका-इराण युद्धामुळे भारतात इंधनटंचाई निर्माण झाली आहे. एलपीजी गॅसच्या टंचाईवर उपाय काढत केंद्र सरकारने राज्याला अतिरिक्त केरोसीन कोटा मंजूर केला आहे. राज्यासाठी सुमारे 3744 किलो लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे. या कोट्याच्या आधारे जिल्हानिहाय वाटप केले जाणार असून, नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना पर्यायी इंधन म्हणून केरोसीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना प्राधान्याने केरोसीन वितरित केले जाणार आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला साधारणतः 3 लिटर केरोसीन देण्यात येणार असून, उपलब्धतेनुसार इतर लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने वितरण केले जाईल. यासाठी स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केरोसीन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसीन उपलबद्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारकदेखील केरोसीन मिळवण्यास पात्र असतील.ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, उपलब्धतेनुसार केरोसीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे. स्थलांतरित मजुरांना ओळखपत्र ग्राह्य धरत केरोसीन देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने राज्यासाठी 3744 किलो लिटर एवढे केरोसीन मंजूर केले आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यासाठी 228 किलो लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी 19 टँकरना मंजुरी मिळालेली आहे. मागणीनुसार तालुकानिहाय केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे.
पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा
इंधनटंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन पेट्रोलपंपांवर गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. बुधवारी (दि. 25) 1121 लिटर पेट्रोल तर 2696 लिटर डिझेलची विक्री झाली आहे. जिल्ह्यात इंधनटंचाई नसून, पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उबलब्ध असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा असून, पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठा करू नये, गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नये व पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, चुकीची माहिती पसरवणार्या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारादेखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, नागरिकांकडून गुरुवारीदेखील पेट्रोलपंपांवर गर्दी केल्याचे चित्र होते. शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर अर्धा किलोमीटरच्या रांगा लागल्याचे चित्र होते. अतिरिक्त गर्दी झाल्याने काही पेट्रोलपंपचालकांनी सर्व वाहनचालकांना पेट्रोल, डिझेल मिळावे, या हेतूने दोन लिटर किंवा तीन लिटर पेट्रोल देण्यात येत होते.
25 मार्च 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार
कंपनी 25 मार्च
रोजी झालेली विक्री पेट्रोल डिझेल
बीपीसीएल 217 577कि.लि. 1028कि.लि.
एचपीसीएल 198 511कि.लि. 879 कि.लि.
आयओसीएल 175 333 एमएस 711 एचडीएस
एकूण 510 1121कि.लि 2696 कि.लि
कंपनी लाभार्थी एकूण गॅस एजन्सी उपलब्ध साठा
एचपी गॅस 763800 42 13795
इंडियन गॅस 152801 29 1028
एकूण 1994708 134 33423
भारत गॅस 1078107 63 18600
इंधनाबाबत चुकीची माहिती पसरवणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय साधला जात आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
घरगुती गॅस सिलिंडरचा
साठाही समाधानकारक असून, काही ठिकाणी किरकोळ अडचणी असल्या तरी एकूण पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व गॅस कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींना गॅस पुरवठा सुरळीत व अखंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.
ग्राहकांनी सोशल मीडियावरील अफवेला बळी पडून अचानक केलेली गर्दी व जरुरीपेक्षा जास्त घेतलेले इंधन यामुळे सगळ्या पंपांवरती गर्दी दिसते आहे व काही ठिकाणी इंधन संपते आहे. ग्राहकांना नम्र आवाहन आहे की, आपल्याला आवश्यक तेवढे इंधन घ्या. उगाचच गर्दी करू नका. जिल्हाधिकार्यांकडील बैठकीमधील आकडेवारीनुसार मागच्या वर्षीपेक्षा जास्त पुरवठा शहर व जिल्ह्यामध्ये ऑइल कंपन्यांकडून झालेला आहे.
– विजय ठाकरे, समन्वयक, राज्य पेट्रोल डीलर संघटना
पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा
इंधनटंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन पेट्रोलपंपांवर गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. बुधवारी (दि. 25) 1121 लिटर पेट्रोल तर 2696 लिटर डिझेलची विक्री झाली आहे. जिल्ह्यात इंधनटंचाई नसून, पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उबलब्ध असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा असून, पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठा करू नये, गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नये व पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, चुकीची माहिती पसरवणार्या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारादेखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, नागरिकांकडून गुरुवारीदेखील पेट्रोलपंपांवर गर्दी केल्याचे चित्र होते. शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर अर्धा किलोमीटरच्या रांगा लागल्याचे चित्र होते. अतिरिक्त गर्दी झाल्याने काही पेट्रोलपंपचालकांनी सर्व वाहनचालकांना पेट्रोल, डिझेल मिळावे, या हेतूने दोन लिटर किंवा तीन लिटर पेट्रोल देण्यात येत होते.
Approval for kerosene distribution in the wake of fuel shortage
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…