शहरात आज रामनवमीचा उत्सव

नाशिक : प्रतिनिधी
आज (दि. 26) चैत्र शुद्ध नवमी अर्थात, रामनवमी असल्याने शहरातील मंदिरे प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहेत. राममंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आरास करण्यात आली आहे. प्रतिपदेपासून राममंदिरांत नवरात्रोत्सव सुरू होता. त्यानिमीत्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आज दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव विविध ठिकाणी साजरा होईल. अभिषेक, पूजा, रामचरितमानस पाठ, सुंदरकांड पाठ, महाआरती, दर्शन व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोेत्सव सुरू आहे. आज (गुरुवार) मंदिरात मान्यवरांच्या हस्ते अभिषेक, पूजा व महाआरती होईल. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे.
तपोवनातील कपिला संगम येथील श्रीराम पर्णकुटी मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. वाल्मीकीनगर येथील कुष्ठपीडितांच्या श्रीराम पंच मंडळातर्फे नवरात्रोत्सव सुरू आहे. आज परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुठे गल्लीतील गोरेराम मंदिरात पूजा व अभिषेक करण्यात येईल. सीतागुंफा येथील गोरेराम मंदिर, रामकुंडाजवळील अहिल्याराम मंदिरात पूजा व अभिषेक होणार आहे.
श्री मारुती मंदिर ट्रस्टतर्फे कार्यक्रम
शहरातील जिल्हा न्यायालय आवारात असलेल्या हनुमान मंदिरात श्री मारुती मंदिर पब्लिक ट्रस्टतर्फे रामनवमीनिमित्त आज, गुरुवारी (दि. 26) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंदिराच्या गाभार्‍याचे नुकतेच नूतनीकरण केले आहे. सकाळी लघुरुद्र होणार असून, दुपारी 12 ला रामजन्मोत्सव होईल. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

हे मार्ग राहणार बंद

आज, रामनवमीनिमित्त पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत मंदिर परिसरातील प्रमुख मार्ग बंद राहणार आहेत. पंचवटीतील सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, लक्ष्मणझुला ते मंदिर मार्ग, तसेच सप्तशृंगीदेवी मंदिराजवळील शिवाजी चौक ते सीतागुंफा मार्ग या सर्व रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

रथोत्सवाचे आकर्षण

रामनवमीला रामकुंडावर भाविकांची स्नानासाठी गर्दी होते. चैत्र शुद्ध एकादशीला निघणारा श्रीराम व गरुड रथोत्सव रामकुंड येथे आल्यानंतर प्रभू श्रीरामाला अवभृत स्नान घालण्यात येते.
धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद
रामनवमीनिमित्ताने शहरातील विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद आयोजित केला आहे.

Ram will come…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago