उत्तर महाराष्ट्र

अश्लील व्हिडिओंच्या आधारे मागितली खंडणी,आक्षेपार्ह क्लिप्समुळे पोलिसही हादरले

अश्लील व्हिडिओंच्या आधारे मागितली खंडणी

सातपूरमध्ये टोळीचा पर्दाफाश, फिर्यादीही संशयाच्या भोवऱ्यात

टॅबमधील खासगी व्हिडिओ चोरी करून ब्लॅकमेलिंग;

१०० हून अधिक आक्षेपार्ह क्लिप्समुळे पोलिसही हादरले

सातपूर :  प्रतिनिधी

अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी मागणी करणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार संशयित आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मूळ फिर्यादीकडेच शेकडो आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने पोलीस यंत्रणाच चक्रावली आहे.
पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या ६३ वर्षीय फिर्यादीचा टॅब चोरी करून त्यामधील मैत्रिणीसोबतचे वैयक्तिक व अश्लील व्हिडिओ मिळवण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची मागणी करण्यात आली. सुरुवातीला फिर्यादीने १० हजार रुपये दिले होते. पुढे मागणी वाढवत गुरुवारी (दि. २) ५० हजार रुपये देण्याचे ठरले असताना पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश पुंडलिक बकरे (२८), प्रकाश रामदास पानपाटील (२५), सुरज सुनिल गवई (२७) आणि श्रीपत भिमराव शिंदे (३८) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून दोन पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींपैकी एक जण फिर्यादीकडे कामाला होता. त्यानेच हार्डडिस्क चोरी करून त्यातील व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या हार्डडिस्कमध्ये २००३ ते २०२४ या कालावधीतील १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक महिलांसोबतचे हे व्हिडिओ असल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. संबंधित फिर्यादी महिलांना उद्योग सुरू करून देण्याच्या नावाखाली ‘कन्सल्टंट’ म्हणून काम करत असल्याचेही समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, पीडित महिला पुढे आल्यास फिर्यादीवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त काळे यांनी स्पष्ट केले. तसेच पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, त्यामुळे त्यांनी न घाबरता तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महत्वाचे
– टॅब व हार्डडिस्क चोरी करून ब्लॅकमेलिंग
– १२ लाखांची मागणी; १० हजार रुपये आधीच दिले
– ५० हजार रुपये स्वीकारताना आरोपी जेरबंद, चार संशयित आरोपी ताब्यात
– १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त
– आरोपींपैकी एक फिर्यादीकडे कामाला होता
– पीडित महिलांनी पुढे यावे, पोलिसांचे आवाहन

५ दिवसांची पोलीस कोठडी
चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

16 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

16 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

16 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

16 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

16 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

17 hours ago