नाशिक : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांच्या चार लाख 61 हजार 910 पैकी चार लाख 54 हजार 654 तक्रारींचा निपटारा करण्यात महापालिकेला यश आले आहे. महापालिकेने विविध नागरी समस्या ऑनलाइन पद्धतीने सोडविण्यासाठी तक्रार पोर्टल सुरू केले आहे. त्यास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. यावरून महापालिकेच्या ऑनलाइन तक्रार निवारण व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास दिसत आहे.
महापालिकेने एकूण तक्रारींपैकी 98.43 टक्के तक्रारी निकाली काढल्याचा दावा केला असला, तरी सध्या सात हजार 253 तक्रारी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, त्यांपैकी पाच हजार 694 तक्रारी या सात दिवसांपेक्षा अधिक, मात्र तीस दिवसांपेक्षा कमी कालावधीपासून प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. काही विभागांत तक्रार निवारणाची गती मंदावल्याची चर्चा आहे.
तक्रार निवारणानंतर नागरिकांकडून घेण्यात आलेल्या अभिप्रायातही संमिश्र चित्र दिसत आहे. एकूण तक्रारदारांपैकी 44.02 टक्के नागरिकांनीच आपला अभिप्राय नोंदवला. त्यातील 56.8 टक्के नागरिकांनीच समाधान व्यक्त केले आहे. महापालिकेच्या सेवांना नागरिकांनी सरासरी 5 पैकी 3.48 गुण दिले आहेत. ऑनलाइन तक्रार व्यवस्थेमुळे नागरिकांना कार्यालयीन हेलपाट्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी तक्रारींचा
दर्जेदार आणि कायमस्वरूपी निपटारा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर कायम आहे. महापालिकेच्या ग्रीव्हन्स डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार चार लाख 61 हजार 910 तक्रारी दाखल झाल्या असून, त्यांपैकी चार लाख 54 हजार 657 तक्रारी मार्गी लावल्या आहेत.
याबाबत केल्या तक्रारी
नागरिकांकडून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज आदी विविध विभागांशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या जात आहेत. त्यात स्ट्रीटलाइट नॉट वर्किंग, अर्थात पथदिवे बंद असण्याच्या तक्रारी सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक भागांत रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत.
Resolution of 4.5 lakh complaints
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…