नाशिक

शहरात कडक बंदोबस्तात ‘नीट’

मागील परीक्षेच्या तुलनेत काठिण्यपातळी अधिक

♦ दहा हजार 29 विद्यार्थी उपस्थित.
♦ 1,133 विद्यार्थी गैरहजर.
♦ 21 परीक्षा केंद्रे.
♦ बायोमेट्रिक पडताळणीनंतरच प्रवेश.
♦ सीसीटीव्हीची नजर.
♦ मोबाइल जॅमर.
♦ सीआयएसएफचे जवान तैनात.

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे रविवारी (दि.21) घेण्यात आलेली नीट-यूजी फेरपरीक्षा नाशिक जिल्ह्यातील 21 परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली. दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत झालेल्या या परीक्षेसाठी नोंदणीकृत 11 हजार 162 पैकी दहा हजार 29 विद्यार्थी उपस्थित राहिले. एक हजार 133 विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, सीआयएसएफ आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांनी विशेष नियोजन केले होते. परीक्षेच्या दिवशी केंद्रांवर सकाळपासूनच विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी गर्दी दिसली. निफाड, लासलगाव, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, मनमाड आदी भागांतून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी नाशिक शहरात दाखल झाले होते.
परीक्षा केंद्रांवर प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी आणि डिजिटल नोंदणी करण्यात आली. त्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. फ्रिस्किंगद्वारे तपासणी करण्यात आली. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, नेटवर्क जॅमर तसेच कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रत्येक परीक्षा केंद्रावर ड्यूटी मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली होती. सीआयएसएफ आणि पोलिसांच्या संयुक्त बंदोबस्तामुळे केंद्र परिसरात शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळाले.
रविवारी दुपारच्या कडक उन्हात परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही चांगलीच कसोटी लागली. अनेक पालक केंद्राबाहेर झाडांच्या सावलीत किंवा उपलब्ध जागांमध्ये तासन् तास थांबून पाल्याची प्रतीक्षा करताना दिसले. काही पालकांनी पिण्याचे पाणी, ग्लुकोज व इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था केली होती.
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका मागील परीक्षेच्या तुलनेत अधिक कठीण असल्याची प्रतिक्रिया दिली. फेरपरीक्षेमुळे मानसिक ताण वाढला असला, तरी अतिरिक्त संधी मिळाल्याबद्दल समाधान असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वाहतूक व्यवस्थापनासाठी महापालिका, पोलीस आणि परिवहन विभागाने विशेष नियोजन केले होते. केंद्रांवर वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

मागील वेळी पेपर अतिशय चांगला गेला होता. यावेळीही पेपर चांगला झाला आहे. मात्र, निकालाबाबत मनात धाकधूक कायम आहे. इतकी मेहनत घेतल्यानंतर पुन्हा कोणताही वाद किंवा पेपरफुटीची घटना घडू नये, अशी अपेक्षा आहे.
– पूजा कदम, विद्यार्थिनी

मनमाडहून परीक्षेसाठी आलो आहे. मागील परीक्षेसाठी के. के. वाघ केंद्र मिळाले होते, तर यावेळी सारडा सर्कल परिसरातील केंद्रावर परीक्षा द्यावी लागली. फेरपरीक्षेमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठा मानसिक ताण होता. आता निकालाचीच प्रतीक्षा आहे. – कुणाल कापसे, विद्यार्थी

‘NEET’ held in the city amidst tight security.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago