नाशिक

लिव्ह इनमध्ये राहणार्‍या रिक्षाचालकाची हत्या

महिलेसह चार संशयितांना अटक, सात दिवस कोठडी

सिडको : प्रतिनिधी
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या रिक्षाचालकाची गळा चिरून हत्या करून मृतदेह कसारा घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसंत गोरखनाथ सातपुते (वय 39, मूळ रा. दहेगाव, ता. कोपरगाव; सध्या रा. साई आंगण रो-हाउस, स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका महिलेसह चार संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हसीना हबीब शेख, साहिल शहा, मोईन शहा आणि सर्फराज सैय्यद अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, वसंत सातपुते हे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हसीना शेख हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. वसंत हे रिक्षाचालक होते. रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची हसीना हिच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि दोघेही दीर्घकाळ एकत्र राहत होते.मात्र, गेल्या काही काळापासून वसंत हे आजारी राहत असल्याचे सांगितले जाते. याचदरम्यान हसीना हिची साहिल शहा या तरुणासोबत ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. हसीना आणि साहिल यांच्यातील वाढत्या जवळकीला वसंत यांचा विरोध होता. यावरून वसंत आणि हसीना यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. या वादातून वसंत यांचा अडथळा दूर करण्याचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी आरोपींनी वसंत यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी वसंत अचानक बेपत्ता झाल्याचे सांगत हसीना हिने इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, हसीनाच्या वर्तणुकीबाबत पोलिसांना संशय आल्याने तपासाला वेगळी दिशा मिळाली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी कसारा घाट परिसरात शोधमोहीम राबविली. त्यावेळी वसंत यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हसीना शेख, साहिल शहा, मोईन शहा आणि सर्फराज सैय्यद यांना अटक केली. या चौघांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी युवराज शिरसाठ करीत आहेत. वसंत सातपुते यांच्या पश्चात आई आणि चार बहिणी असा परिवार आहे.

Rickshaw driver living in a live-in relationship murdered.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago