नाशिक

चांदवड शहरात रस्त्यांना आले नदीचे स्वरूप

पावसाची हजेरी; कॉम्प्लेक्ससह दुकानांत शिरले पाणी

चांदवड : वार्ताहर
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या चांदवड शहरासह तालुक्यात सोमवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाजी चौक परिसरासह शहरातील मुख्य रस्त्यांवर पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांनी अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले होते. कॉलेज रोडवरील रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात पावसाचे पाणी थेट काही दुकानांमध्ये शिरल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले.
सोमवारी चांदवडचा साप्ताहिक बाजार असल्याने शहरात नागरिक, शेतकरी आणि व्यापार्‍यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारकरूंची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील सोमवार पेठ परिसरात गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आले, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
रस्त्यावरून पाण्याचे जोरदार प्रवाह वाहत असल्याने वाहनचालक आणि पादचार्‍यांना रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. कॉलेज रोडवरील रेणुका कॉम्प्लेक्ससह काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. दरवर्षी पहिल्याच पावसात हीच समस्या उद्भवते. पालिकेने पाणी निचर्‍याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक व्यापार्‍यांनी केली.

बळीराजा सुखावला; मशागतीला वेग

तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग मिळणार आहे. वरुणराजाचे स्वागत करत शेतकर्‍यांनी आगामी काळातही अशाच चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Roads in Chandwad city turned into rivers.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

20 hours ago

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

20 hours ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

20 hours ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

20 hours ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

20 hours ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

20 hours ago