♦ संशयिताला अटक, जुन्या वादातून हल्ला
♦ जखमी सागर एखंडे याची प्रकृती स्थिर
सिडको : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेला गरबा पाहण्यासाठी गेलेल्या सागर एखंडे या युवकावर सावतानगर परिसरात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी चाकूने वार केल्याचा संशय असलेल्या रितेश मराठे याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर एखंडे हा सावतानगर येथे गरबा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी संशयित युवकांनी जुन्या भांडणाचा विषय काढून त्याच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर सागरवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समजते. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करीत सागरला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तपास सुरू केला. या हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच इतर युवकांचा या घटनेत सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Youth attacked with knife during Garba festival in Savatanagar
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…