डॉक्टरांना मारहाण, अतिदक्षता विभागाची तोडफोड
सिडको : प्रतिनिधी
रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी पंचवटीतील आयुष रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टरांसह कर्मचार्यांना मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी अतिदक्षता विभागात विनापरवानगी प्रवेश करून तेथील काचा फोडण्यात आल्या. रुग्णालयाच्या मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन जणांसह तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना सचिन जैन (वय 37, रा. प्रीती अपार्टमेंट, पंचवटी) यांच्यावर निमाणी येथील आयुष रुग्णालयात उपचार सुरू होते.
1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.21 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना मिळाल्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास सचिन जैन, जितेंद्र पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले तीन ते चार अनोळखी इसम रुग्णालयात आले.
डॉ. कृष्णा यादव यांच्या बाह्यरुग्ण विभागातील कॅबिनमध्ये प्रवेश करून संबंधितांनी गोंधळ घातला. त्यानंतर त्यांनी विनापरवानगी अतिदक्षता विभागात प्रवेश करत आरडाओरड आणि शिवीगाळ केली. कर्तव्यावर असलेले डॉ. अक्षय पाटील आणि डॉ. मिलिंद पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
तसेच रुग्णालयातील कर्मचारी दीप्तेश दोंदे, दुर्गेश बच्छाव, प्रशांत धुमाळ आणि फिर्यादी यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यानंतर अतिदक्षता विभागाच्या काचा फोडून रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले.
या प्रकरणी रुग्णालयातील परिचारक (ब्रदर) आयुष प्रवीण तायडे (वय 21) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन जैन, जितेंद्र पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे आणि परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अर्चना वाघ करीत आहेत.
Ruckus at AYUSH hospital after patient’s death
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…