सिडको : प्रतिनिधी
सिडकोतील गोविंदनगर परिसरातील सद्गुरूनगर येथे मंगळवारी वाळूची वाहतूक करणारा डंपर रस्त्यातील खड्ड्यात अडकल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी खोदकामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी संबंधित रस्ता खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा व्यवस्थित न बुजविल्याने रस्त्याखालची माती खचली आणि तेथे मोठा खड्डा निर्माण झाला. मंगळवारी या मार्गावरून जात असताना वाळूने भरलेल्या डंपरचे मागील चाक खड्ड्यात रुतल्याने वाहन अडकले. घटनेमुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहन बाहेर काढण्यासाठी मदत केली. यापूर्वीही याच ठिकाणी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला. खोदकाम झालेल्या रस्त्यांची तातडीने पाहणी करून सर्व खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…