नाशिक

लग्नात नोकरीबाबत खोटी माहिती दिल्याने नवविवाहितेची आत्महत्या

पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
लग्नाच्या वेळी स्वतःला बँकेत कॅशियर असल्याचे खोटे सांगून फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर तसेच सासरच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवळाली गावातील वडारवाडी येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत विवाहितेचे नाव निशा राजू पवार (वय 23, रा. वडारवाडी, देवळालीगाव) असे आहे. याप्रकरणी तिचे भाऊ राहुल अशोक शिंदे (वय 28, रा. नाशिक वेस, बारादरी रोड, सिन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती राजू गंगाराम पवार, अमोल राजू गायकवाड आणि सविता पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशाचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राजू पवार याच्याशी झाला होता. विवाह ठरविताना राजू याने आपण एसबीआय बँकेत कॅशियर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. मात्र, विवाहानंतर तो प्रत्यक्षात एका मॉलमध्ये काम करत असल्याचे समोर आले. या फसवणुकीमुळे आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे निशा नैराश्यात गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, 28 जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास निशा हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 108, 319(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी राजू गंगाराम पवार (वय 27) आणि अमोल राजू गायकवाड (वय 30, रा. राणेनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अटकेची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत.

Newlywed woman commits suicide after providing false information about her job at the time of marriage.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago