ठेकेदाराकडून अटींचे उल्लंघन, ‘महसूल’चा कानाडोळा
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील जाखोरी गावालगत असणार्या दारणा नदीपात्रात शासनाने वाळू लिलाव काढला आहे. या वाळू लिलावाला जाखोरीच्या नागरिकांनी बहुमताने विरोध दर्शवला असूून, शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेधदेखील दि. 29 एप्रिलच्या एका विशेष ग्रामसभेत करत लिलाव रद्द करण्याची एकमुखी मागणी केली होती. मात्र, लिलाव रद्द होणे दूरच; परंतु शासनाने ठरवून दिलेल्या अटींचे उल्लंघन ठेकेदाराकडून होत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू वाहतूक करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंच अर्पणा कळमकर, उपसरपंच राहुल धात्रक यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा याची भेट घेणार असल्याचे सांगितले.
शासनाने ग्रामसभेला अधिकार दिलेले असतानादेखील शासनाच ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आणत आहे. अनेक दिवसांपासून जाखोरीचा वाळू लिलाव बंद व्हावा, यासाठी जाखोरीकर लढा देत आहेत. मात्र, शासनाने आपली मनमानी कायम ठेवत लिलाव सुरूच ठेवला आहे. वाळू लिलाव बंद होत नाही? याचा अर्थ काय समजायचा, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत असताना यात काही अर्थकारण झाले का? अशीही शंका आता नागरिकांना येत आहे. शासनाने लिलाव घेताना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. वाळू वाहतूक करत असताना केवळ सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान करायची. शिवाय ज्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करतो त्या वाहनाला जीपीएस असणे आवश्यक आहे. असे अनेक नियम असताना रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक होणे म्हणजे वाळूची चोरी तर होत नाही ना? असे अनेक प्रश्न उभे आहेत. वाळू लिलाव रद्द होण्याकामी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सोसायटी व जाखोरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. राज्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशीदेखील निवेदन देऊन चर्चा केली. मात्र, कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने काही गोष्टी कुणाच्या संगनमताने घडत आहेत का? असा सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे.
पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…
बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…
मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…
मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…
दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी…