नाशिक

सातपूर पोलिसांचे ‘ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन’

103 टवाळखोरांवर कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या ‘ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन’ अंतर्गत उघड्यावर मद्यपान करून सार्वजनिक शांतता भंग करणार्‍या 103 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच अवैधरीत्या देशी दारू विक्री करणार्‍या दोन जणांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे तसेच संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्तांंच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेदरम्यान सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर, अशोकनगर, श्रमिकनगर आणि सातपूर गाव परिसरात पोलिसांच्या विविध पथकांनी संयुक्त कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान उघड्यावर तसेच पार्सल पॉइंट परिसरात मद्यपान करणार्‍या 103 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय, प्रबुद्धनगर व श्रमिकनगर परिसरात अवैध देशी दारू विक्री करणार्‍या दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईदरम्यान 13 समन्सची बजावणी करण्यात आली, तर जामीनपात्र वॉरंटमधील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या विशेष मोहिमेत सातपूर, अंबड, इंदिरानगर, एमआयडीसी, देवळाली कॅम्प, उपनगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली.

Satpur Police’s ‘All-Out Combing Operation’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

15 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

15 hours ago