सातपूरच्या गोल्ड मॅनला लुटले

 

सातपूरच्या गोल्डमॅन मकरंद साळी यांना

लुटण्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर

सातपूर: प्रतिनिधी

येथील वेताळ बाबा मंदिर बस स्टॅन्ड सिग्नल लगत रात्रीच्या सुमारास एका गोल्डमॅन टेलरिंग व्यवसायिकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत चौदा तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, सातपूर महादेव वाडीतील बाबा टेलरिंग चे संचालक गोल्डमन मकरंद साळी हे टेलरिंगचे व्यवसायिक असून रात्रीच्या च्या सुमारास दुकान बंद करून साळी घराकडे निघाले होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या चोरटयांनी साळी यांना चाकूचा धाक दाखवून चौदा तोळे सोन्याचा ऐवज लुटून नेला.याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक बटुळे हे करीत आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असून सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे दीपक खरपडे सचिन आजबे तुषार देसले. हे आरोपी शोधण्यासाठी रवाना झाली असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती सध्यातरी समोर येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *