नाशिक: प्रतिनिधी
निमा,जिल्हा कौशल्य विभाग आणि रोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी(दि.3 एप्रिल)ला निमा हाऊस येथे दुपारी 2 वाजता खास महिलांसाठी नाविन्यता जनजागृती अंतर्गत स्टार्टअप,स्टँडअप आणि उद्योजकता विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.
नाशिक महानगरातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. जास्तीतजास्त गरजू महिलांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विभागाच्या सहसंचालक श्रीमती अनिसा तडवी, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, कौशल्य विकास च्या सहआयुक्त अमिषा तडवी, वुमन चेंबर ऑफ इंडियाच्या वृंदा रावल व शेफाली शर्मा,
जनशिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि स्टार्टअप इंडियाचे मेंटॉर श्रीकांत पाटील यांनी केले.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…