आस्वाद

मुखवट्यामागे दडलेला स्वार्थ!

– अफजल पठाण

चेहरे तो बहुत मिले जिंदगी की राहों में,
कुछ अपने बनकर मिले, कुछ मतलब से मिले
जिन्हें हमने अपना समझकर दिल में जगह दी,
वक्त बदलते ही वही सबसे पहले बदल गए
माणसाचंही काहीसं असंच असतं. जशी मांजर दूध पिताना आजूबाजूला पाहते आणि तिला वाटतं, मला कोणी पाहत नाही, तशीच काही माणसं आयुष्यात वावरत असतात. पण फरक एवढाच की, मांजर दूध पिऊन निघून जाते; मात्र माणसं तुमच्याकडून विश्वास, माहिती, संपर्क, ओळखी आणि मदत घेतात आणि गरज संपली की, तुम्हालाच डोळे दाखवायला सुरुवात करतात. काही माणसं तुमच्याजवळ येतात ती तुमच्यासाठी नाही, तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींसाठी. तुमचे चांगले संबंध पाहून जवळ येतात, तुमचे संपर्क वापरतात, तुमच्याकडून शिकून घेतात, तुमच्या ओळखीने स्वतःची कामं करून घेतात आणि तुमच्या सावलीत उभे राहून स्वतःची उंची वाढवतात. आणि एकदा त्यांचा स्वार्थ साधला की, तुम्ही कोण? असा प्रश्न विचारायला त्यांना क्षणभरही वेळ लागत नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही धावपळ केली, ज्यांना वेळ दिला, ज्यांना लोकांशी जोडून दिलं, ज्यांच्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली तेच कधी कधी वेळ बदलताच तुमच्याकडे पाठ फिरवतात. समोरून म्हणतील, काहीही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण वेळ आली की त्याच माणसांच्या हातात विश्वासाचा हात नसतो, तर पाठीत खंजीर असतो. काही तर इतके पुढे जातात की, तुमच्या पाठीवर हात ठेवून तुमचे कौतुक करतील आणि दुसर्‍याच क्षणी तुमच्या पायाखालची जमीन सरकवण्याचा प्रयत्न करतील. हेच तर आयुष्याचं विचित्र गणित आहे. तुम्ही त्यांच्यासाठी ‘आपले’ असता, जोपर्यंत त्यांना तुमची गरज असते. गरज संपली की तुम्ही ‘परके’ होता. कधी कधी तर तुमच्या पोटातच घुसून बसलेली माणसं संधी मिळताच आतूनच वार करतात. बाहेरच्या शत्रूपासून आपण सावध राहतो, पण आपला माणूसच शत्रूच्या भूमिकेत उभा राहील, याचा अंदाज बांधता येत नाही. म्हणूनच प्रत्येक जवळ येणारा माणूस आपला नसतो आणि प्रत्येक गोड बोलणारा माणूस विश्वासू नसतो. काही माणसं तुमच्याशी नातं जोडत नाहीत, ती तुमच्या उपयोगाशी नातं जोडतात. जोपर्यंत तुमच्याकडून त्यांना काही मिळत असतं, तोपर्यंत फोनवर फोन, भेटीगाठी, गोड बोलणं आणि आपलेपणा असतो. काम झालं की फोन बंद, भेटी बंद आणि आपलेपणाही बंद. कालपर्यंत तुमच्या एका फोनवर धावून येणारे आज तुमचा फोन उचलायलाही वेळ नसल्याचं सांगतात. कालपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, आपण एक नाण्याची दोन बाजू आहे. असे म्हणणारे आज ओळख तरी काय? असा प्रश्न विचारतात. पण अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. माणसाला फसवून तुम्ही त्याचा विश्वास जिंकत नाही, तर स्वतःचा खरा चेहरा त्याला दाखवत असता. आणि ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाला तडा देणे म्हणजे फक्त त्या व्यक्तीशी गद्दारी नाही, तर माणुसकीशी केलेली गद्दारी आहे. आयुष्यात माणसं नक्की जोडा, पण प्रत्येकाला मनाच्या घराची चावी देऊ नका. संपर्क द्या, पण
स्वतःची किंमत विसरू नका. मदत करा, पण स्वतःचा गैरफायदा होऊ देऊ नका. विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही. जगात शत्रू कमी धोकादायक असतात पण धोका देणारे ‘आपले’ जास्त धोकादायक असतात.

Self-interest hidden behind the mask!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भोळी बाभळी

- प्रणाली देशमुख तू सुंदर आहेस पण ग्लॅमरस नाही, कदाचित म्हणूनच तू गुणाची खाण जरी…

14 minutes ago

सहअस्तित्व

- वासवदत्ता अग्निहोत्री ‘साथी हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना....’ हिंदी चित्रपटात…

21 minutes ago

जिवंत बुरशीपासून कपडे

- डॉ. किशोर पवार कपडे म्हणजे निर्जीव वस्तू, अशी आपली आजवरची संकल्पना होती. मात्र, चीनमधील…

26 minutes ago

स्त्रीचा संघर्ष संपतो तरी कधी?

लग्नाआधी मैत्रिणींच्या गप्पा असतात कुठे फिरायला जायचं? शॉपिंगला कधी भेटायचं? आज काय प्लॅन? आणि लग्नानंतर…

32 minutes ago

मोकळीक

स्वैराचार नव्हे, जबाबदारीची जाणीव आजच्या आधुनिक युगात ‘मोकळीक’ किंवा ‘स्वातंत्र्य’ हा शब्द प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा…

37 minutes ago

पांढर्‍या सोन्याची काळी कहाणी

शेतात डोलणारा कापूस दुरून पाहिला की डोळ्यांना पांढरेपण दिसते. मात्र, त्या पांढर्‍या बोंडामागे उभ्या असलेल्या…

50 minutes ago