दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण

भोंदूबाबावर गुन्हा दाखल

निफाड /लासलगाव : वार्ताहर
घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील एका भोंदू महाराजाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधित भोंदू महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय अंदाजे 31, रा. धारणगाव खडक) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला (वय 28, व्यवसाय खासगी सुरक्षारक्षक, रा. उत्तमनगर, नाशिक) हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचे दोन विवाह अपयशी ठरल्याने आणि मुलगी तिच्यासोबत नसल्याने ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या परिस्थितीत तिच्या आई – वडिलांनी तिला धारणगाव (खडक) येथील तथाकथित प्रतिगाणगापूर मठात नेले. तेथे महेशगिरी काकडे हा स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांवरील भुताटकी काढण्याचे काम करीत असल्याचा आभास निर्माण करत होता.
दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी पीडित महिला आई – वडिलांसह मठात गेली असता, काकडे याने तिच्या अंगात करणीबाधा असल्याचे सांगून तिला विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले. पुढे त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेत सतत वैयक्तिक आणि अश्लील आशयाचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी पंचवटी परिसरात भेटीस बोलावून काकडे याने पीडितेला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. भीती दाखवून तिच्यावर बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले. तसेच तिचे फोटो काढून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित महिला मानसिक धक्क्यात होती. कुटुंबीयांच्या भीतीमुळे आणि आरोपीच्या प्रभावामुळे तिने तक्रार देण्याचे टाळले. दरम्यान, आरोपीने तिचे मोबाइलमधील पुरावेही जबरदस्तीने डिलीट केल्याचे समोर आले आहे. नंतर पीडितेचे लग्न झाले. या प्रकाराबाबत कोणतीही तक्रार दिली नाही. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्यानंतर तिने अखेर पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, कोमल वर्दे आणि अ‍ॅड. स्वाती तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित महिला व तिच्या पतीने लासलगाव पोलीस ठाणे गाठले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनेची पडताळणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Sexual abuse of a woman in the name of divine power

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago