नाशिक

पोळा सणावर महागाईसह मंदीचे सावट

मनमाडला पावसाची दडी आणि कोरडा दुष्काळ

मनमाड : प्रतिनिधी
गेल्या महिन्याभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट फटका यंदाच्या बैलपोळा सणाला बसला आहे. रविवारी मनमाडचा मोठा आठवडे बाजार असूनही पोळ्याच्या साहित्यासाठी बाजारात अपेक्षित गर्दी पाहायला मिळाली नाही. यामुळे व्यापारी आणि सामान विक्रेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला होता आणि सणासुदीला बाजारात चैतन्य होते. मात्र, यंदा पावसाअभावी परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बैलपोळा हा शेतकर्‍यांचा सर्वांत मोठा आणि आत्मीयतेचा सण. आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यासाठी आणि पूजण्यासाठी शेतकरी वर्षभर उत्सुक असतात. मात्र, पाऊसच नसल्याने आणि चारा-पाण्याचे संकट गडद झाल्याने शेतकर्‍यांच्या मनावर चिंतेचे ढग आहेत.
सण कसा साजरा करायचा? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, ज्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.
मनमाडच्या आठवडे बाजारात एरवी पोळ्याच्या आधीच्या रविवारी बैल सजावटीचे साहित्य, घुंगरू, वेसण, कासरे, गेरू आणि नवीन दोर्‍यांनी दुकाने ओसंडून वाहत असतात. ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. यंदा मात्र चित्र वेगळे होते. दुकाने तर सजली होती, पण ग्राहक गायब होते. सेव्हन स्टार नावाच्या दुकानाच्या मालकांनी सांगितले की, “आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो रुपयांचे पोळा साहित्य भरले होते. मात्र, आज दिवसभरात मोजकेच शेतकरी आले. दुष्काळामुळे शेतकरी खरेदीला घाबरत आहेत. आमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.” इतर विक्रेत्यांनीही हीच व्यथा मांडली. बाजारात फक्त पोळ्याचेच नाही, तर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
बाजारात आलेल्या एका शेतकर्‍याने सांगितले, “गेल्या महिन्यात पाऊसच नाही. पिके वाळली आहेत. घरात खायला अन्न नाही आणि जनावरं कशी जगवायची, याची चिंता आहे. अशात पोळ्याचा आनंद साजरा करणे कठीण आहे. घरची परिस्थिती पाहता, यंदा सण साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे.” पोळा सण हा शेतकर्‍यांच्या संघर्षाचे आणि आशेचे प्रतीक असतो, मात्र यंदा तो दुष्काळाच्या सावटाखाली साजरा होत आहे,
हे नक्की.

Shadow of economic slowdown and inflation looms over the Pola festival.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

7 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

7 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

7 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

7 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

7 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

7 hours ago