सप्तशृंगगड : वार्ताहर
सप्तशृंगगड ते नांदुरी घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 10 सप्टेंबर 2026 पासून हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी (कळवण) डॉ. काश्मिरा संखे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत राज्य महामार्ग 21 वरील सप्तशृंगगड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानूर – अलियाबाद या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मंजूर आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 4 (कळवण) यांच्यामार्फत सप्तशृंगगड ते नांदुरीदरम्यानच्या घाट मार्गात काँक्रिटीकरणाचे काम
सुरू आहे.
वाहतूक बंद ठेवण्याचे कारण
घाट मार्गात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम चालू असताना वाहतूक वळवण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. चालू वाहतुकीत काम केल्यास कामाचा दर्जा आणि गती प्रभावित होत असून, नियोजित वेळेत काम पूर्ण करणे अशक्य होत होते. तसेच आगामी कुंभमेळा 2027 च्या दृष्टीने भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, सुरक्षिततेचा उपाय म्हणून आणि रस्ता काँक्रिटीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
The road from Saptashrungagad to Nanduri Ghat will be closed to traffic starting tomorrow.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…