नाशिक

सिन्नर तालुक्यात एप्रिलच्या प्रारंभीच टंचाईच्या झळा

18 वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर; टँकरने पाणीपुरवठा सुरू

सिन्नर : भरत घोटेकर
अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्याला एप्रिलच्या प्रारंभीच टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील चार एप्रिलच्या प्रारंभीच टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील चार गावांच्या 18 वाड्या-वस्त्यांना टँकर मंजूर झाले असून, त्यातील सर्वच वाड्या-वस्त्यांना प्रत्यक्ष टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर अन्य एका गावाला टँकरसाठीचा प्रस्ताव सिन्नर पंचायत समितीकडे प्राप्त झाला असून, तो मंजुरीसाठी लवकरच प्रांत कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठवडाभर अगोदरच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सिन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागतात.
यावर्षी तालुक्यात पर्जन्यमान चांगले राहिले. याशिवाय, देवनदीच्या पूरचार्‍यांचे पाणी पूर्व भागात पोहोचल्याने टँकरची गरज भासणार नाही असे वाटत होते. मात्र, ज्या भागात या चारीचे पाणी नाही, त्या गावांचे मार्च महिन्यात टँकरसाठीचे प्रस्ताव आले. तालुक्यातील धुळवड, पिंपळे, पाटपिंप्री आणि धारणगाव या चार गावांनी वाड्या-वस्त्यांसाठी टँकरची मागणी नोंदविली होती. या चार गावांच्या वाड्या-वस्त्यांसाठी शासनाने टँकर मंजूर केले आहेत. त्यासाठी पाटपिंप्री, धारणगाव, पिंपळे या तीन गावांच्या 18 वाड्या-वस्त्यांसाठी 3 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यात देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे आणि खोपडी ते मिरगाव या सुमारे 58 किलोमीटरच्या पूरचार्‍या बनविण्यात आल्या आहेत.
या पूरचार्‍यांना यावर्षी चांगले पाणी होते. त्यामुळे सुमारे 48 गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या गावांना यावर्षी टंचाईच्या झळा काहीशा कमी प्रमाणात बसणार आहेत.
तालुक्यात मनेगावसह 22 गावे, वावीसह 11 गावे, कणकोरीसह 5 गावे, वडांगळीसह 14 गावे, नायगावसह 9 गावे आणि बारागावपिंप्रीसह 7 गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्या तरी विविध कारणांमुळे या योजनेतील गावांना टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सध्या या योजनांच्या पाणीस्रोतांना पाणी असले तरी थकीत वीज देयकांअभावी कधी वीजपुरवठा खंडित होणे, गळती लागणे, जलवाहिनी नादुस्त होणे, वीजपंप बंद पडणे अशा कृत्रिम कारणांमुळे टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. तालुक्यातील माळवाडी (शिवाजीनगर) या गावाचा टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाला आहे.

दिवसाला सात फेर्‍या

मंजूर असलेल्या 18 वाड्यांना 12 हजार लिटरच्या दोन टँकरच्या माध्यमातून 5 खेपा तर 24 हजार लिटरच्या एक टँकरच्या माध्यमातून 2 खेपा अशा एकूण दिवसभरात 7 खेपांद्वारे या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. दिवसाला 1 लाख 8 हजार लिटर पाणी या वस्त्यांना
सुरू आहे.

या वस्त्यांना टँकर मंजुरी

पाटपिंप्रीच्या ताकाटे, वाळूंज मळा, एकलव्यनगर, नवा मळा, आमराई, सेंद्रे वस्ती, एरंडे मळा, सातपुते वस्ती, कार वस्ती, फकीरावाडी, पाटलाचीवाडी, खिंडीची वस्ती, पिंपळे येथील मेनखिंड, पातळी, सदगीर व बिन्नर वस्ती, तळे वस्ती आणि धारणगावची काळे वस्ती, गोमासे वस्ती, वाळेकर वस्ती या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यास मंजुरी देण्यात आली आहे. तेथे सिन्नर पंचायत समितीच्या वतीने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

इंधनाचे पैसे थकल्याने खासगी टँकरवर भिस्त

गेल्या वर्षीच्या इंधनाचे 40 लाख थकल्याने शासकीय टँकरला डिझेल मिळत नाही. परिणामी, पाणीपुरवठ्याची भिस्त खासगी टँकरवर आहे. सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी 9 गावे आणि 113 वाड्या-वस्त्यांना 10 शासकीय आणि 7 खासगी अशा 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. दिवसाला तालुक्यात सुमारे 115 टँकरच्या फेर्‍या सुरू होत्या. गेल्या वर्षी नांदूरशिंगोटे येथील पेट्रोलपंपचालकाचे इंधनाचे 40 लाख रुपयांचे बिल थकले आहे. त्यामुळे यावर्षी शासकीय टँकरला कोणीही डिझेल देण्यास तयार नाही. त्यामुळे 4 शासकीय टँकर इंधन नसल्याने उभे असून, 3 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पाणीपुरवठ्यासाठी खासगी टँकरवर 15 लाख रुपयांचा खर्च झाला होता.

सिन्नर तालुक्यातील धरणातील पाण्याचा साठा

कोनांबे – 22 टक्के, भोजापूर – 10 टक्के, बोरखिंड – 35 टक्के, सरदवाडी – 10 टक्के, माळवाडी – 15 टक्के, दातली -25 टक्के, उंबरदरी- 26 टक्के, दुशिंगपूर- मृतसाठा.

Shortage hits Sinnar taluka in early April

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिक जिल्ह्यात इंधन साखळी सुस्थितीत; टंचाईची स्थिती नाही

नाशिक : विशेष प्रतिनिधी जिल्ह्यात इंधन पुरवठा साखळी सुस्थितीत असून, शहर व जिल्ह्यात टंचाईची कोणतीही…

9 minutes ago

महिला आरक्षणाला पाठिंबा, परिसीमनला तीव्र विरोध?

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी विरोधकांची एकजूट नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना…

15 minutes ago

राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट; मुसळधार पाऊस, गारपिटीचा इशारा

नांदेडमध्ये 47, तर अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी देशातील हवामानात सध्या…

25 minutes ago

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

21 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

21 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

21 hours ago