नाशिक

सिन्नरच्या शेतकर्‍यांसाठी 15 एप्रिलला ‘डिजिटल शेतीशाळा’

पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन; मोबाइलवरून सायंकाळी 7.30 वाजता सहभाग

सिन्नर : प्रतिनिधी
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणपूरक उपाययोजना महत्त्वाच्या ठरत आहेत. या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी दि. 15 एप्रिल रोजी ‘डिजिटल शेतीशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी दिली.
या डिजिटल शेतीशाळेचे हे तिसरे सत्र असून, त्यामध्ये ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून पिकांचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
यावेळी कामगंध सापळ्यांचा वापर करून कीड नियंत्रण कसे करावे, शेतात पक्षी थांबे उभारण्याचे महत्त्व, मित्र कीटकांचे संवर्धन तसेच रसशोषक किडींवर नियंत्रणासाठी पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले
जाणार आहे. शेतकर्‍यांना या प्रशिक्षणासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नसून, मोबाइलच्या माध्यमातून आपल्या घरातूनच सायंकाळी 7.30 वाजता या सत्रात सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ, महिला बचतगट तसेच कृषीताईंनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या शेतीशाळेत सहभागी होता येणार असून, अधिक माहितीसाठी गावच्या सहाय्यक कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा किंवा संबंधित क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

‘Digital Farming School’ for Sinnar farmers on April 15

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

19 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

19 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

19 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

20 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

20 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

20 hours ago