नाशिक

सिन्नर न्यायालयाची नवी वास्तू होणार ‘भव्य’

भविष्यातील गरजांचा आराखड्यात समावेश करण्याची आ. कोकाटेंची सूचना

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराचा विस्तार आणि वाढते न्यायालयीन कामकाज लक्षात घेऊन प्रस्तावित दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत केवळ भव्यच नव्हे तर नागरिकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण सिन्नर नगरपरिषदेच्या सभागृहात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झाले. पुढील अनेक वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन आराखड्यात आवश्यक बदल करण्याच्या सूचना कोकाटे यांनी दिल्या.
प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याची पाहणी करताना न्यायालयीन कामकाजाची सुलभता, पक्षकार व नागरिकांच्या सुविधा, वकिलांसाठी आवश्यक व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. इमारत तळमजला अधिक तीन मजल्यांची असावी, अशी सूचना आमदार कोकाटे यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, सिन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष जयसिंह सांगळे, तालुका बार असोसिएशनचे सदस्य, नगरसेवक तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वकिलांच्या सूचनांनाही महत्त्व

आराखड्याच्या सादरीकरणावेळी आमदार कोकाटे यांनी अधिकारी, वास्तुविशारद आणि उपस्थित वकिलांशी चर्चा केली. न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या वकिलांच्या सूचनांचा अंतिम आराखड्यात समावेश करून इमारत अधिक कार्यक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

न्यायाधीशांसाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग

न्यायाधीशांची सुरक्षितता आणि गोपनीयता लक्षात घेऊन स्वतंत्र प्रवेशद्वार व स्वतंत्र मार्ग असावा. न्यायालयीन कक्ष आणि कार्यालयीन व्यवस्था पुरेशा क्षमतेची असावी, यावरही त्यांनी भर दिला. तृतीयपंथीय नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली.

इतर न्यायालयांच्या चुका टाळा’

महाराष्ट्रातील नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयीन इमारतींचा अभ्यास करून तेथे निर्माण झालेल्या व्यावहारिक व तांत्रिक अडचणी सिन्नरच्या इमारतीत राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. आजच्या गरजांसोबत भविष्यातील गरजांचाही विचार करून आराखडा अंतिम करण्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

एकाच छताखाली सुविधा

न्यायालयात येणार्‍या पक्षकार, नागरिक, वकील आणि कर्मचार्‍यांना आवश्यक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुसज्ज उपाहारगृह, छायाप्रत केंद्र, प्रशस्त वकील कक्ष, नागरिकांसाठी प्रतीक्षाकक्ष आणि सुरक्षित वाहनतळाचा समावेश करण्यावर भर देण्यात आला.

Sinnar Court’s new building to be ‘grand’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

16 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

17 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

17 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago