महाराष्ट्र

नसरापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे

सहा अधिकार्‍यांची टीम स्थापन

पुणे :
नसरापूर येथे एका 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेवरून लोकांमध्ये संताप वाढला असून, नराधमाला फाशी द्या, अशी मागणी केली जात आहे. आता या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे. नसरापूर घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे.

नसरापूरच्या घटनेनंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. नसरापूरमधील नागरिकांनी शनिवारी (दि. 2 मे) पुण्यातील नवले पूल बंद केला होता. त्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी सरकारकडून हालचाल केली जात आहे.
नसरापूरप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये सहा अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांपैकी दोन अधिकारी या महिला आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकार्‍यांचा या एसआयटीमध्ये समावेश आहे.
पुण्यातील नसरापूर (ता. भोर) येथे 1 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका 65 वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणार्‍या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवले. नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगार्‍याखाली झाकून ठेवला.
दुपारी चिमुकली न दिसल्याने तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृतावस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून त्या चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता. मात्र दुपारी साडेतीन वाजताचे ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्खं कुटुंब हादरलं. या घटनेनंतर गावकर्‍यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला.
इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरीही आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावा या नराधमाने कोर्टात केला. शनिवारी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. यावेळी युक्तिवादही नराधमाच्या समोरच झाला. मग न्यायाधीशांनी या नराधमाला प्रश्न विचारला, तुमची केस नेमकी काय आहे माहिती आहे का? त्यावर या नराधमाने अक्षरश: संताप येईल, असं उत्तर दिलं. ही मारामारीची किरकोळ केस आहे, असं हा असूर कोर्टात म्हणाला.
या प्रकरणातील नराधमाला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावणी आहे. मात्र, या नराधमाने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुरावे नसल्यानं तो दोन वेळा निर्दोष सुटला. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.

चिमुकलीच्या वडिलांची भूमिका

या प्रकरणातील चिमुकलीवर शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर तिच्या वडिलांनी मोठी भूमिका घेतली आहे. मुलीला न्याय मिळेपर्यंत नेतेमंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करत आहेत, असेही ते म्हणाले.

SIT to investigate Nasrapur case

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago