नाशिक

ओझरला आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू

मायलेकाचा उघड्यावरील संसार क्षणात उद्ध्वस्त

ओझर : वार्ताहर
गडाख कॉर्नर, ओझर येथील जवळील उड्डाणपुलाखाली उघड्यावर संसार थाटणार्‍या एका वृद्ध महिलेवर काळाने मोठा आघात केला आणि डोळ्यांदेखत मुलाने जीव सोडला.तिला ज्या मुलाचा आधार होता त्याच्याच मृत्यूनंतर आता 70 वर्षीय वृद्ध आईसमोर जगण्यासाठीचा प्रश्न उभा राहिला आहे. पुलाखाली फाटक्या गादीवर निपचित पडलेला मुलगा आणि त्याला उठविण्यासाठी आक्रोश करणारी आई हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून परिसरातील नागरिकही हेलावून
गेले होते.
गडाख कॉर्नर येथील उड्डाणपुलाखाली राहणार्‍या काशाबाई लक्ष्मण जाधव यांचा मुलगा मंगेश लक्ष्मण जाधव याचा मंगळवारी मृत्यू झाला. काशाबाई या मुलगा मंगेशसोबत पुलाखालीच उघड्यावर राहून मजुरी करत होत्या. सोबतच उदरनिर्वाहासाठी भीक मागणे तसेच कचरा वेचण्याचे कामही त्या करत असल्याची माहिती मिळाली आहे.
काशाबाई यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मंगेश गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आजारी होता. मंगळवारी सकाळी आठ वाजता आईने त्याला चहा दिला.त्यानंतर मंगेशने “आई, मी देवाघरी जाईल,” असे म्हटले आणि काही वेळातच त्याला मृत्यूने गाठले.
मंगेशची प्रकृती पाहण्यासाठी शेजारी राहणारे दीपक ओमप्रकाश दलोड आणि त्यांचे एक मित्र तेथे आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर मंगेशचा मृत्यू झाल्याची खात्री केली. मंगेशच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे काशाबाई यांनी पोलिसांना स्पष्ट सांगितले असून, आजारपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे. मात्र, मुलाच्या मृत्यूने या वृद्ध माउलीच्या आयुष्यातील आधारच हिरावला आहे. राहण्यासाठी घर नाही, जवळचे नातेवाईक नाहीत आणि आता मुलाच्या पश्चात भविष्याचीही चिंता अशा परिस्थितीत काशाबाई यांच्यासमोर पुढे काय, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
या घटनेनंतर शिवसेनेचे गटनेते सुनील कदम, शहरप्रमुख नितीन काळे, नगरसेवक रोहित लभडे, किशोर त्रिभुवन, नगरपरिषेदेचे सफाई अधिकारी गणेश महाजन जितू खत्री,अनिल बंदरे आदी नागरिकांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले.एकटे पडलेल्या या वृद्ध माऊलीला आता आधार कोण देणार हा प्रश्न ओझरच्या संवेदनशील समाजासह प्रशासनासमोर उभा राहिला आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन काशाबाई जाधव यांना निवारा, आवश्यक मदत, शासकीय योजनांचा लाभ आणि पुढील आयुष्यासाठी आधार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Son dies before mother’s eyes in Ozar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

19 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

19 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

19 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago