नाशिक

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले ब्रह्मगिरी

तिसरा श्रावणी सोमवार : पोलीस, प्रशासनाचे वाहतूक, सुरक्षेचे नियोजन

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त प्रसिद्ध ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रविवारी (दि. 30) सायंकाळपासूनच भाविकांचा अथांग जनसागर त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाला. रात्रीच्या गडद अंधारात ब्रह्मगिरीच्या कडेकपार्‍या ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमून निघाल्या.
पहिल्या श्रावणी शनिवारी झालेल्या तुफान गर्दीच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस व प्रशासनाने वाहतूक आणि सुरक्षेचे कडक नियोजन केले होते. खंबाळा वाहनतळ सक्तीचे करत तळेगाव फाट्यावरून सर्व खासगी वाहनांना तेथेच वळवण्यात आले. तेथून त्र्यंबकेश्वर शहरापर्यंत केवळ एसटी बसने वाहतूक सुरू होती. स्थानिक नागरिकांच्या वाहन पासमध्येही तिसरा शनिवार, रविवार व सोमवार वगळण्यात आले होते.
कुशावर्त तीर्थावर रविवार सकाळपासूनच स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. जीवरक्षक दल आणि टेहळणी मनोर्‍याद्वारे कुशावर्तावर नजर ठेवली जात होती. शहरात कुशावर्त आणि प्रदक्षिणा मार्गावर जाण्यासाठी चोख बॅरिकेडिंग करण्यात आले होते. गर्दी वाढल्यानंतर भाविकांना पेगलवाडी फाट्यावरून थेट प्रदक्षिणा मार्गाकडे वळवण्यात आले.
गतवर्षी पेगलवाडी फाट्यावरील प्रयागतीर्थ तलावात घडलेल्या दुर्घटनेची दखल घेत आणि सध्या सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी तलावाकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद केले होते. संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पथदीप सज्ज करण्यात आले होते. विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींकडून ठिकठिकाणी फराळ, साबूदाणा खिचडी, फळे व पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात येत होते. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा बल, राखीव पोलीस दल आणि दंगा नियंत्रण पथकाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Brahmagiri resounded with the chant of ‘Har Har Mahadev’.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

18 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

18 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

18 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

18 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

19 hours ago