आस्वाद

दक्षिण भारत श्री सिद्ध मंगल यात्रा

उत्तराखंड चारधामची यशस्वी यात्रा पार केल्यानंतर आम्हाला दक्षिण भारत यात्रेचे वेध लागले होते. आपणा प्रापंचिक व्यक्तीला येणार्‍या सर्व अडचणींचा सामना करत मोठ्या प्रयत्नाने आम्ही दक्षिण भारत यात्रेचे बुकिंग केले. just go with flow उक्ती प्रमाणे जसे होईल तसे पाहू याप्रमाणे आम्ही आमचा प्रवास सुरू केला. मागच्या प्रवासाच्या अनुभव पाहता आमच्या रेल्वेची वेळ रात्रीची असूनसुद्धा आम्ही सकाळीच सटाणा ते मुंबई प्रवास सुरू केला. संध्याकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून आमची नागरकोईल एक्स्प्रेस सुरू झाली. तब्बल 40 तासांचा प्रवास करून आम्ही सकाळी 10.00 वाजता आम्ही नागरकोईल जन्क्शन येथे उतरलो. नेहमीच ठरलेलं असल्यासारखं इथेही आमचं स्वागत एका लग्नाच्या वरातीने झाले. भाषा कळत नसून सुद्धा त्या तालावर ठेका धरावासा वाटला. प्रवासाचा संपूर्ण थकवा त्याने निघून गेला.
त्यानंतर तेथून आम्ही स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल या आमच्या पहिल्या ठिकाणाकडे निघालो. बोटीने तेथे पोहचावे लागते एका बोटीत जवळपास 100/150प्रवासी घेऊन आमची बोट निघाली. अवघा पाच ते 10 मिनिटांचा सागरी प्रवास करून आम्ही तेथे पोहचलो. दूरवर पसरलेला अथांग महासागर. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर ह्यांचा संगम असलेले हे ठिकाण.लाल रंगाच्या दगडाने बनवलेल्या या स्मारकात 70 फूट उंच घुमट आहे. स्मारकात विवेकानंदांची मोठी मूर्ती आहे. स्मारकाच्या समोर काळ्या दगडातील श्रीपाद मंडपम आहे, त्यात पार्वती मातेच्या पदचिन्हाची मूर्ती आहे. परिसरात ध्यान मंदिर असून आम्हीही तेथे ध्यानाला बसलो. धावपळीचा, उन्हातान्हाचा प्रवास करून शिणलेल्या मनाला शांत करण्याचे सामर्थ्य या ठिकाणात आहे. तो संपूर्ण परिसर अत्यंत नयनरम्य असा आहे.
तेथून आम्ही भारतातील पहिल्या काचेच्या पुलावर प्रवास केला. काचेतून दिसणारा स्वच्छ समुद्र आणि समुद्रातील खडक. समोरच दिसणारा प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्वज्ञअसणार्‍या तिरुवल्लुवर ह्यांचा भव्य पुतळा. त्यांच्या त्यांच्या तिरुवकरल या ग्रंथातील 133 प्रकरणांचे प्रतीक म्हणून पुतळ्याची उंची 133 फूट आहे. पुतळ्यामध्ये जाण्यासाठी पायर्‍या आहेत. दूरवर पसरलेला अथांग महासागर आपल्या भारतभूमीच्या समृद्धतेची साक्ष देतो. या ठिकाणी भेट दिल्यावर लक्षात येते की, स्वामी विवेकानंदाना ज्ञानाचा साक्षात्कार या ठिकाणी का झाला असेल? समुद्राचे रौद्र रूप त्याची भव्यता डोळ्यात साठवून आमची स्वारी वॅक्स म्युझियम येथे निघाली. तेथे आम्हाला मोठं मोठ्या हस्तींचे पुतळे बघावयास मिळाले.प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट ह्या उक्तीचा अनुभव आम्ही येथे घेतला.तेथून आम्हाला कन्याकुमारी येथील सूर्यास्त दर्शनाची आस होती, परंतु ढगाळ वातावरणामुळे आम्ही बघू शकलो नाही.परंतु सायंकाळच्या लाईट शो मध्ये उजळणारे पुतळ्याचे सौन्दर्य बघून भरून पावलो. त्या दिवशी. कन्याकुमारी येथील एका चर्चचे उद्घाटनासाठी संपूर्ण नगरी सजली होती. तो सोहळादेखील अप्रतिम होता. त्यानंतर आम्ही भगवती अम्मन मंदिरात देवी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. माता पार्वतीचे कुमारी रूप अत्यंत सोजवळ ,सुंदर मनमोहक रूप बघून छान वाटले.डोळ्यांत सूर्योदय दर्शनाची आस ठेवून आमची आजच्या दिवसाची
सांगता झाली.
सूर्योदयाची वेळ सकाळी 6.30ची होती. मोठं मन घेऊन आम्ही 6 वाजताच sunrise point वर पोहचलो.चंद्रकोर जशी कवीमनाला भुरळ घालते त्याप्रमाणे सूर्योदयाच्या सर्व छटा आम्हाला याचि देही याचि डोळा बघायला मिळाल्या. पहाटेच्या त्या धुंद वातावरणात जणू सौभाग्याचं लेणं लेवून अवघ आकाश आपल्या सख्याला म्हणजेच सागराला साद घालत होत. त्यानंतर तेथील लोकल मार्केट मधून आम्ही काही वस्तूंची खरेदी केली. तेथून आम्ही त्रिवेंद्रम येथील कुबेराचा खजिना असलेल्या पद्मनाभ स्वामी मंदिराकडे प्रस्थान केले.
पद्मनाभाचे वर्णन मी पामराने काय करावे? जगातील सर्वांत श्रीमंत हिंदू मंदिरांपैकी एक हे मंदिर आहे. 18व्या शतकात मार्तंड वर्माने पुनर्ररचित केलेले हे मंदिर द्रविड शैलीचा उत्तम वास्तुकला आणि तळघरातील अब्जावधींच्या सोन्याच्या खजिन्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भगवान विष्णूची शेषशयनी मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात पुरुषांना सोहळे आणि स्रियांना साडी किंवा पट्टू हा ड्रेस कोड अनिवार्य आहे. त्या शिवाय प्रवेश नाही. मंदिरात मोबाइल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स नेता येत नाही. दाक्षिणात्य शैलीतील भव्य गोपुरम आपले लक्ष वेधून घेतात.पुरुष सूक्ताचा जप करत आम्ही दर्शन रांगेत उभे राहिलो. भगवंताच्या भव्य मूर्तीच्या दर्शनाने आम्ही भरून पावलो.दर्शन रांगेतून जात असता भगवंताच्या रसोईचे मोठं मोठे भांडे बघून बघून त्यांच्या श्रीमंतीची कल्पना येते.दोन व्यक्तीही उचलू शकनार नाही इतक्या मोठया समया. इतर अनेक वस्तू जणू कुबेराचे भांडारच. यानंतर आम्ही प्रसाद घेन्यासाठी प्रसाद रांगेत उभे राहिलो.दर्शनाची घाई करत असल्यामुळे आमच्या ह्यांना भगवंताला डोळे भरून बघता आले नाही ह्याची खंत वाटत होती. ती चर्चा चालू असतांनाच अहो आश्चर्यम एक अत्यंत तेजस्वी असे वयोवृद्ध व्यक्ती ह्यांच्या जवळ येऊन त्यांच्या थाळीतील प्रसादाचे केळ घेतले. त्यांचे तेज बघून आमचे मस्तक आम्ही त्यांच्या चरणावर ठेवले.त्या वेळी त्यांनी आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर ठेवला. तेव्हा डोळ्यांवाटे फक्त अश्रूंचा पूर सुरु झाला. त्यावेळी आमची मनस्थिती एक वेगळीच अनुभूती घेत होती. साक्षात श्री विष्णू त्यांच्या रूपाने आमच्या समोर उभे होते हा भास आम्हाला झाला. एका शब्दाचे संभाषण नाही फक्त आशीर्वादाच्या लहरी आमच्या ठायी जाणवत होत्या. त्याच अवस्थेत आम्ही पायसचा प्रसाद घेऊन तेथून बाहेर पडलो. (टीप -दर्शनासाठी दोन रांगा असतात एक सामान्य आणि दुसरी 500/-रु. पर हेडप्रमाणे शीघ्र सेवा दर्शन ज्याची जशी इच्छा तसे ते दर्शन घेऊ शकतात.)
दक्षिण भारत यात्रेतील पहिल्या लेखाची सांगता इथेच करते. पुढील लेखात राहिलेल्या प्रमुख ठिकाणच्या अनुभव घेऊ. त्यात चारधामातील प्रमुख आणि ज्योतिर्लिंगांतील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असणार्‍या रामेश्वर दर्शनाची अनुभूती काही वेगळीच आहे.

South India Sri Siddha Mangal Yatra

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago