दिल्ली, शिमलामध्ये फक्त 3 हजारांत चकाचक, सुरक्षित सरकारी रेस्ट हाउस

नवी दिल्ली : प्रतिनिधी
जनतेच्या सोयीसाठी हिमाचल प्रदेश सरकारने नवी दिल्ली, चंदीगड आणि शिमला येथील चार सरकारी अतिथिगृहांमधील 24 खोल्या ऑनलाइन बुकिंगसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या खोल्यांचे भाडेही कमी करण्यात आले आहे. सर्व करांसहित भाडे आता प्रतिखोली प्रति दिन 4,000 रुपयांवरून 3,000 रुपये झाले आहे.
या खोल्या ’हिम अतिथी’ पोर्टलद्वारे आरक्षित करता येतील. सरकारने यापूर्वीच नवी दिल्लीतील हिमाचल भवन आणि हिमाचल सदन, चंदीगडमधील हिमाचल भवन आणि शिमला येथील विली पार्क सर्किट हाउस येथील 24 खोल्या सर्वसामान्यांच्या ऑनलाइन आरक्षणासाठी अधिसूचित केल्या होत्या. आता, पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन आरक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगमनाच्या तारखेच्या तीन दिवस अगोदरपर्यंत ’हिम अतिथी’ पोर्टलवर रूम बुकिंग करता येईल. प्रति रूम 3,000 चे आगाऊ पेमेंट केल्यावरच बुकिंग कन्फर्म केले जाईल. पेमेंटसाठी नेट बँकिंग, क्यूआर कोड, यूपीआय, डेबिट कार्ड आणि क्रेडिटकार्ड हे पर्याय उपलब्ध असतील. 24 खोल्या वगळता, चार सरकारी अतिथीगृहांमधील इतर खोल्यांच्या भाड्यात कोणताही बदल झालेला नाही. या खोल्यांचे भाडे पूर्वीप्रमाणेच प्रति खोली प्रतिदिन रु. 1,200 राहील, ज्यामध्ये सर्व करांचा समावेश आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक कामकाजाच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत उपलब्ध खोल्यांपैकी अंदाजे 40 टक्के खोल्या आरक्षित होतात आणि उर्वरित अंदाजे 60 टक्के खोल्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरक्षित होतात.
नागरिकांना पूर्वनिश्चित प्रक्रियेनुसार शासकीय अतिथीगृहांमधील खोल्या ऑनलाइन आरक्षित करता येतील.

कोणत्या रेस्ट हाउसमध्ये किती खोल्या?
हिमाचल भवन,नवी दिल्ली :           7 खोल्या
हिमाचल सदन, नवी दिल्ली :          4 खोल्या
हिमाचल भवन, चंदीगड :                3 खोल्या
विली पार्क सर्किट हाउस, शिमला :   10 खोल्या

Spick-and-span, safe government rest houses in Delhi and Shimla for just ₹3,000.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *