नाशिक

शाहूनगरात नागरिकावर मोकाट श्वानांचा हल्ला

सिडको : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपूर्वी खुटवडनगर येथे मोकाट श्वानांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच परिसरालगत असलेल्या शाहूनगरमध्ये पुन्हा मोकाट श्वानांनी नागरिकावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 11) रात्री साडेदहाच्या सुमारास चार ते पाच मोकाट श्वानांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात संतोष कदम हे जखमी झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कदम हे रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. आयटीआय परिसरातून शाहूनगरच्या दिशेने जात असताना रस्त्यावर चार ते पाच मोकाट श्वानांचे टोळके त्यांना आडवे आले. काही वेळातच या श्वानांनी कदम यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कदम यांनी प्रसंगावधान राखत श्वानांना दूर लोटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रतिकारामुळे काही श्वान तेथून पळून गेले. मात्र, एका श्वानाने कदम यांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
खुटवडनगरमध्ये काही दिवसांपूर्वी मोकाट श्वानांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यातच शाहूनगरमध्ये पुन्हा श्वानांच्या टोळक्याने नागरिकावर हल्ला केल्याने मोकाट श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पायी जाणार्‍या नागरिकांना मोकाट श्वानांच्या टोळक्यांपासून धोका निर्माण होत असून, महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार घटना घडूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Stray dogs attack a citizen in Shahunagar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago