नाशिक

एसटीचा डिजिटल कारभार प्रवाशांच्या मुळावर

ऑनलाइन पैसे कट होऊनही रोख रकमेची सक्ती; नाशिक-शेगाव बसमधील प्रकार

निफाड : तालुका प्रतिनिधी
राज्य शासनाच्या परिवहन महामंडळाकडून डिजिटल सेवेचा मोठा डांगोरा पिटला जात असला, तरी प्रत्यक्षात हा कारभार प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा ठरत आहे. नाशिक- निफाडदरम्यान दैनंदिन प्रवास करणार्‍या एका नोकरदाराला नाशिक-शेगाव बसमध्ये आठवडाभरात दोनदा ऑनलाइन पैसे कट होऊनही पुन्हा रोख पैसे द्यावे लागल्याचा संतापजनक अनुभव आला आहे.
निफाड येथे नोकरीनिमित्त दररोज नाशिक-निफाड असा प्रवास करणारे मोहन महाजन नाशिक येथून दररोज निमाणी बसस्थानकातून निफाड येथे येतात. बस प्रवासाकरिता राज्य शासनाने डिजिटल सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे मोहन महाजन यांनी नाशिक येथून निमाणी बसस्थानकातून नाशिक-शेगाव बसने 1 जून रोजी सकाळी 8.15 वाजता प्रवास सुरू करत एमएसआरटीसीच्या क्यूआर कोडवर निफाडचे भाडे 91 रुपये फोन-पेद्वारे जमा केले.
वाहकाकडे तिकिटाची मागणी केली. मात्र. वाहकाने ऑनलाइन 91 रुपये जमा झाले नसल्याचे सांगत रोख स्वरूपात रक्कम देण्याची मागणी केली. ऑनलाइन गेलेले पैसे परत खात्यात येतील, असा खुलासा केला. त्यानंतर महाजन यांनी 91 रुपयांचे तिकीट रोख पैसे देऊन घेतले. मात्र, ऑनलाइन जमा झालेले 91 रुपये काही परत जमा झाले नाहीत. असाच अनुभव महाजन यांना त्याच नाशिक- शेगाव बसने 8 जून रोजी प्रवासादरम्यान आला. तेव्हाही ऑनलाइन पैसे जमा होऊनही रोख 91 रुपये द्यावे लागले. मात्र, ऑनलाइन कपात झालेले 91 रुपये परत आले नाहीत.

चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला!

या संदर्भात मोहन महाजन यांनी निफाड येथील बसस्थानकातील कंट्रोल रूमला भेट देऊन माहिती दिली. मात्र, नाशिक-शेगाव बस येवला आगाराची असून, तक्रार करण्यासाठी येवला येथे जाण्याचा सल्ला दिला. नोकरीची जबाबदारी सोडून पुन्हा 182 रुपये मिळविण्यासाठी येवल्याला जाणे म्हणजे चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला, अशी गत झाली आहे. असा प्रकार नित्याने होत असेल तर काहीतरी गफला करून सामान्य प्रवाशांच्या घामाचे पैसे उडविले जात आहेत का, अशी शंका निर्माण होते. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

 

ST’s digital operations spell trouble for passengers.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago