आस्वाद

विद्यार्थी परायण शिक्षक

– सुप्रिया सुरवाडे
विद्यार्थी हा शिक्षक परायण असावा, शिक्षक हा ज्ञान परायण असावा आणि ज्ञान हे सेवा परायण असावे… विद्यार्थी, शिक्षक आणि ज्ञान ही त्रिकुटी यातच खूप काही दडलेल आहे… शिक्षक म्हटलं की खडू- फळा- शाळा ही आठवल्या शिवाय राहत नाही… आता सर्व डिजिटल, पण याआधी मात्र काळा फळा आणि त्यावर सफेद खडूने गिरवलेली अक्षरे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत होते… शिक्षक म्हणजे एकमेव असं व्यक्तिमत्व की त्यांना वाटतं आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षाही मोठ व्हावं.. काहीतरी भवितव्य त्यांनी घडवावं… यातच त्यांचा खूप मोठा अभिमान असतो आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षक स्वतः तळमळ करीत असतात..
एकदा एका शाळेत एक शिक्षक बोलत असताना एका विद्यार्थ्याने एक प्रश्न गुरुजींना विचारला ..आम्ही शिक्षक दिन साजरा करतो, आम्हाला शिक्षकांबद्दल कृतज्ञता आहे, अपार प्रेम आहे त्यांनीच आमचे जीवन घडवलं आहे, पण माझा एक प्रश्न आहे की शिक्षकांचं कार्य नेमकं कसं असतं..? हा प्रश्न विचारल्यानंतर सगळीकडे मात्र शांतता झाली, की हा कसा प्रश्न आहे आणि आता मात्र सर्वांना उत्सुकता लागली की यावरती आपले गुरुजी मात्र काय उत्तर देतील?…
गुरुजींनी म्हणजेच शिक्षक त्यांनी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडे एक नजर टाकली आणि एक स्मित करत सर्वांना म्हणाले, प्रश्न तसा पाहिला तर थोडा सोपा आणि थोडासा जटिल देखील.. पण तरी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो… आता मात्र सर्व विद्यार्थी त्या उत्तराची वाट पाहत होते गुरुजी म्हणाले तुम्ही इंग्रजी शिकताना ए फॉर अ‍ॅप्पल म्हणतात, अ‍ॅप्पल म्हणजे काय तर सफरचंद ते तर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ..जेव्हा आपण सफरचंद कापतो तेव्हा त्यात किती बिया असतात??? विद्यार्थ्यांनी उत्तर दिले चार-पाच बिया असतात.. शिक्षकांनी पुन्हा विद्यार्थ्यांकडे पाहिले आणि स्मित करून म्हणाले ..ठीक आहे आता त्या सफरचंदामध्ये असलेल्या बिया त्यातील एक बी मी घेतली आणि जमिनीत रुजवली त्यातून सफरचंदाचे झाड उगवले, ते मोठे झाले..आता त्या सफरचंदाच्या झाडाला किती सफरचंद येतील…??? तेव्हा विद्यार्थी म्हणाले ते तर काही मोजता येणार नाहीत..?
मग पुन्हा सर्व विचार करू लागले आता यातून बोध काय मिळणार ..मग सर्वांची उत्सुकता बघता शिक्षक म्हणाले, जसं एका बीमधून त्याचं झाडात रूपांतर होऊन अगणित असे सफरचंद त्या झाडाला येतात.. त्याचप्रमाणे एक शिक्षक अगणित विद्यार्थ्यांचं जीवन घडवू शकतात आणि घडवतातही… हेच त्यांचं कार्य आहे.
एका शिक्षकांनी घडवलेला विद्यार्थी जर तो पुन्हा शिक्षक झाला तर तोच विद्यार्थी पुन्हा शिक्षक म्हणून अजून काही विद्यार्थी घडवतो, अशी ही साखळी न संपणारी असते हेच तर शिक्षकांच कार्य असतं …की जे विद्यार्थ्यांना घडवत असतात, त्यांच्या जीवनाला आकार देत असतात… म्हणून विद्यार्थी जीवन म्हणजे एखादा ओबडधोबड दगड आणि त्यापासून आकार देऊन एक साजेसं शिल्प, मूर्ती तयार करणारा शिल्पकार म्हणजे शिक्षक आहे….
असे जीवनाला आकार देणारे शालेय जीवनापासून ते आयुष्याच्या वाटेवर ही तू लढ म्हणणारे सर्व शिक्षकवृंदांना कोटी कोटी नमन करून या शिक्षकदिनी कृतज्ञता व्यक्त करूयात…

Student teacher

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

5 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

5 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

5 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

5 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

5 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

5 hours ago