दोन वेळा जीवनदान ; अखेर संपवली जीवनयात्रा

अखेर त्या मनोरुग्णाची आत्महत्या..

दिक्षी प्रतिनिधी

पिंपळगाव बसवंत येथील राकेश संजय आहिरे वय २७ या मनोरुग्णानी कादवा नदीत उडी मारून आत्महत्या केली .
पिंपळगाव बसवंत येथील सदर व्यक्ती ने १८ मार्च रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील कादवा नदीच्या पुलावरून ऊडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्या वेळेस रस्त्याने जाणारे दोघांनी त्यास वाचविण्यात यश मिळाले होते. त्यानंतर दि.११एप्रिल रोजी रात्री च्या वेळेस अमरधाम येथे जळत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेथेही त्यास वाचविले अखेर बुधवार दि १३ रोजी कादवा नदीत एका व्यक्तीचा मृतदेह सकाळी 10 वाजता तरंगताना दिसला पिंपळगाव बसवंत अग्निशमन दलाने सदर व्यक्तीचा म्रुतदेह बाहेर काढले असता राकेश संजय आहिरे हिच व्यक्ती असल्याची खात्री झाली असता पिंपळगाव बसवंत प्राथमिक रूग्णालयात शव विच्छेदनास नेण्यात आले . या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहै.

चितेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला पण….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *