नाशिक

सुमित पगारे हत्याकांडाचा 24 तासांत छडा

सुमित पगारे हत्याकांडाचा 24 तासांत छडा

12 संशयित अटकेत

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जुन्या बिटको हॉस्पिटल चौकातील गोसावीवाडी परिसरात झालेल्या सुमित पगारे हत्याकांडाचा नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी 12 संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य दोन संशयित आरोपी फरार असून, पोलीस पथके त्यांचा शोध
घेत आहेत.
16 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गोसावीवाडी परिसरातील टिळे हॉस्पिटलसमोरील पानटपरीवर सुमित भाटिया, सुमित पगारे आणि आकाश बोर्डे थांबले होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून काही संशयित तेथे आले. ‘आपल्यातील वाद मिटवून टाकू’ असे सांगत हात मिळवण्याच्या बहाण्याने एका संशयिताने कमरेला लावलेली बंदूक काढून सुमित पगारे यांच्या पोटावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पगारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर नाशिकरोड पोलिसांनी तपासाला वेग दिला. सुमित भाटिया यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान अर्जुन सुरेश पिवाल, मन्ना भरत गांगुर्डे, आशिष पिवाल, साद पठाण यांच्यासह 12 संशयितांना पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि हत्यारे जप्त करणे तसेच पुढील तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अटक केलेल्या 12 आरोपींपैकी 10 जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. मृत सुमित पगारे आणि संशयित आरोपी यांच्यात कारागृहात असतानाच आर्थिक देवाणघेवाण तसेच वैयक्तिक कारणांवरून वाद झाले होते. याच पूर्ववैमनस्यातून हत्येचा कट रचून गोळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार असलेल्या दोन संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली वाहने व हत्यारे जप्त करण्यासाठी तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Sumit Pagare murder case solved within 24 hours

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago