नाशिक

पोलीस असल्याची बतावणी करत महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी
पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तीन अनोळखी व्यक्तींनी 68 वर्षीय महिलेच्या अंगावरील दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उपनगर परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरला मुरलीधरन कुडीकंटकटेल (वय 68, गृहिणी) या सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या घरासमोरून जयभवानी रोडवरील मेडिकलमध्ये जात होत्या. त्यावेळी घराबाहेरील रस्त्यावर तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.
आम्ही पोलीस अधिकारी आहोत, अशी बतावणी करून या तिघांनी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यामध्ये 32 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, किंमत एक लाख 20 हजार रुपये, तसेच 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, किंमत 86 हजार रुपये, अशा एकूण दोन लाख सहा हजार रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. दागिने घेऊन तिन्ही संशयित तेथून पसार झाले.
घटनेनंतर महिलेने उपनगर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

Woman’s jewellery worth two lakh rupees stolen by someone posing as a police officer.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago