बारामती : प्रतिनिधी
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एकतर्फी घोडदौड करत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या विजयाने केवळ बारामतीचाच नव्हे, तर दिवंगत अजित पवार यांचा 2019 मधील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रमही मोडीत काढला आहे.
जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले होते.
मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली होती. या जागेसाठी एकूण मतदान सुमारे 58.17% इतके झाले होते. या झालेल्या 2,21,719 मतदानात, सुनेत्रा पवार यांना पडलेल्या मतांचा वाटा तब्बल 98.23% इतका प्रचंड आहे. न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय. घुटुकडे आणि इतर अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. अभिजित बिचुकले आणि आणि करुणा मुंडे यांचीही स्थिती अतिशय करुण राहिली. बारामतीचा हा निकाल राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबाचे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे या बालेकिल्ल्यावरील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो. अजित पवारांच्या पश्चात बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांना भरभरून मतदान केल्याचेही दिसून आले. यातून जणू बारामतीच्या जनतेने अजितदादांना अनोखी आदरांजली वाहिली.
अजितदादांचे 2019 चे रेकॉर्ड मोडीत
बारामतीत आतापर्यंत सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 1,65,265 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत कोणतीही मोठी राजकीय लढत समोर नसताना हा विक्रम मागे टाकला आहे.
Sunetra Pawar’s ‘record-breaking’ victory in Baramati
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…