मृताचे शीर घेऊन संशयित थेट पोलीस ठाण्यात

 

दिंडोरी: प्रतिनिधी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे दाक्षिणात्य सिनेमा स्टाईल शेजाऱ्याची  पिता पुत्राने कुऱ्हाड कोयत्याने शिर धडावेगळे करत शिर व कुऱ्हाड घेवून पोलीस स्टेशन ला दाखल झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.मागील दोन वर्षी पूर्वी मुलीचे लग्न मोडण्यास व आता मुलगी सासरहून बेपत्ता झाली यास मयत जबाबदार असल्याचे संशयावरून वाद होत हा खून झाल्याची प्रार्थामिक चर्चा असून पोलीस अधिक तपास करत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की ननाशी येथील गुलाब रामचंद्र वाघमारे व सुरेश बोके हे शेजारी शेजारी राहतात गेल्या दोन वर्षापासून वाद होते. त्यात मुलीचे ठरलेले लग्न मोडले यावरून वाद होता मुलगी सासरहून बेपत्ता झाली त्यास ही गुलाब जबाबदार असल्याचा संशय सुरेश बोके यांना येत त्यांचेत 31 डिसेंबर ला वाद झाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व जण नव वर्षाचे स्वागत अन एकमेकांना शुभेच्छा देत असताना वाघमारे व बोके यांचे वाद उफाळून आला यावेळी सुरेश बोके व त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी थेट कुऱ्हाड कोयत्याने गुलाब वाघमारे यांचे मानावर हल्ला करत शिर धडा वेगळे केले अन कुऱ्हाडी सह शिर घेवून पोलीस औट पोस्ट गाठले.घटनेची माहिती पेठ पोलीस ठाण्यात मिळताच पोलिसांचा फौज फाटा ननाशी येथे दाखल होत बंदोबस्त वाढविण्यात आला.परिसरात खळबळ उडत गावात घबराटीचे वातावरण पसरले .पोलिसांनी दोघा पिता पुत्रांना अटक करत तपास सुरू केला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

12 hours ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

12 hours ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

12 hours ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

12 hours ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

13 hours ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

13 hours ago