नाशिक

स्वाइन फ्लू, डेंग्यू नियंत्रणात; मनपा प्रशासनाचा दावा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लू व डेंग्यू हे दोन्ही आजार नियंत्रणात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. महापालिकेने केलेल्या पूर्वप्रतिबंधात्मक उपायांमुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे प्रमाण सर्वांत कमी असल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.
स्वाइन फ्लूवरील टॅमीफ्लूसह डेंग्यूच्या उपचारांसाठी लागणारा औषधसाठा महापालिकेकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने एक विशेष व्यवस्था केली आहे. त्यानुसार जर एखाद्या रुग्णाने खासगी रुग्णालयांमध्ये किंवा डॉक्टरांकडे उपचार घेतले, तरीही त्यांना महापालिकेकडून आवश्यक औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्वाइन फ्लूची लाट संपूर्ण देशात पसरली असून, दर एक वर्षाआड अशी लाट येत असते. देशात इतरत्र रुग्ण वाढत असले, तरी नाशिकमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत स्वाइन फ्लू पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे मनपा प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असले तरी त्यातील बहुतांश रुग्ण गंभीर नाहीत. ज्या एक-दोन रुग्णांची स्थिती गंभीर झाली होती, त्यामागे त्यांची कमी रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर शारीरिक कारणे होती. बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबवून डासोत्पत्तीचे सर्व स्रोत शोधून ते नष्ट करण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूचा धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या बिटको रुग्णालय, तसेच डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात स्वतंत्र कक्ष (स्वाइन फ्लू वॉर्ड) तयार करण्यात आले आहेत. तेथे सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Swine flu and dengue under control; Municipal Corporation administration claims.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago